मुंबई मराठी पत्रकार संघावर संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलचा झेंडा..

मुंबई I झुंज न्यूज : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये अखेरीस संदीप चव्हाण यांच्या टीमने दणदणीत विजय मिळवत परिवर्तन पॅनलचा झेंडा फडकवला आहे. ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांची मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांच्या वर्तुळात मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक ही सातत्याने चर्चेचा विषय होती. ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर हे समर्थ पॅनल तर्फे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तथापि परिवर्तन पॅनलचे ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांनी तब्बल ३१६ मते खेचून घेत विजय मिळवला. सुकृत खांडेकर यांना १६० मते मिळाली.

ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यामुळे ते निवडून येतात का याकडे मंत्रालयासह संघातील अन्य माध्यम प्रतिनिधींचेही लक्ष होते. तथापि परिवर्तन पॅनलच्या ज्येष्ठ पत्रकार स्वाती घोसाळकर यांनी 288 मते मिळवत बाजी मारली. उदय तानपाठक यांना 208 मते मिळाली. तर परिवर्तनच राजेंद्र हुंजे यांना 225 आणि विष्णू सोनवणे यांना 203 अशी नेते मिळाली राजेंद्र हुंजे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आले. पत्रकार संघाच्या कार्यवाहपदी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र शिर्के यांचा देखील मोठ्या मतांनी विजय झाला. परिवर्तन पॅनल आणि समर्थ पॅनलला मिळालेली मते आणि निकाल पुढीलप्रमाणे…

कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड यांचा २१० मतांनी विजय
जगदीश भोवड ३३६
सारंग दर्शने १२६

परिवर्तन पॅनल कार्यकारणी सदस्य विजयी उमेदवार ( ९)
देवेंद्र भोगले २८२
दिवाकर शेजवलकर २८२
गजानन सावंत २७४
आत्माराम नाटेकर २७३
विनोद साळवी २७२
किरीट गोरे २४७
अंशुमान पोयरेकर २४६
राजेश खाडे २४५
राजीव कुलकर्णी २३४
—————————————-
समर्थ पॅनल
कल्पना राणे १८५
श्यामसुंदर सोन्नर १७४
उमा कदम १७२
रवींद्र भोजने १६२
नंदकुमार पाटील १६१
अरविंद सुर्वे १४६
संतोष गायकवाड १४२
विठ्ठल बेलवाडकर ११६
राजेंद्र साळस्कर १०४
महेंद्र जगताप ९४
केतन खेडेकर ९२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *