मा. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या प्रशासनाला सूचना
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील सेक्टर नं १ परिसरातील वैष्णव माता प्राथमिक विद्यालयाच्या मागे नाला आहे. सध्या शहरात पावसाळा सुरू आहे. रविवार मुसळधार पाऊस होता, त्यामुळे जागोजागी शहरात पावसामुळे खड्यात पाणी साचले आहे. नालेही पाण्याने तुडुंब भरून जात आहेत. महानगरपालिका वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे केली जातात, परंतु काही ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यानी आरोग्याला धोका निर्माण होतं असतो.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा मा. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी या प्राथमिक विद्यालयाची पाहणी केली तसेच या शाळेमागे असलेला नाला याची साफसफाई होणे आवश्यक असल्याने त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला तसे आदेश दिले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण नाला स्वच्छ करणे आवश्यक आहे. अशा सूचना देत संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते सूचना देऊन सदर नाल्याला त्वरित स्वच्छ करावे असे सांगितले आहे.
माजी नगरसेवक विलास मडिगेरी हे आपल्या प्रभागातील नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही, याची सतत दखल घेत असतात व त्याप्रमाणे प्रशासनालाही सूचना देत असतात. पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यामुळे कोणत्याही नागरिकाला आरोग्याचा धोका निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून तसेच प्राथमिक विद्यालयात लहान – लहान बालके हे शिक्षण घेण्यासाठी येतात, त्यांच्या आरोग्याला तसेच शिक्षक व पालकांनाही आरोग्याचा धोका निर्माण होऊ नये. याकरिता दक्षता घेण्यात आल्याचे विलास मडिगेरी यांनी सांगितले आहे.