मोदींच्या 400 पार साठी एक आपला खासदार द्यायचाच’ आढळरावांसाठी ‘यांनी’ घेतलीय शपथ..

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केलेली आहे. शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील अशी या मतदारसंघात लढत होत आहे.  जुन्नर तालुक्यात प्रचार करत आसतान शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची शपथ घेण्यात आली आहे. 

जुन्नर तालुक्यातील प्रचारा दरम्यान भाजप नेत्या आशा बुचके यांच्या घरी शिवाजीराव आढळराव पाटील गेले  होते, यावेळी बेणके, सोनवणे, काळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या प्रसंगी चहापानानंतर  आढळराव पाटील घरातून बाहेर पडण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात घेत  ”हम सब साथ है अशा घोषणा दिल्या आढळराव पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला असून त्यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवायचं आणि 400 पार मध्ये  मोदींसाठी एक आपला खासदार द्यायचा अशी शपथ घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *