डॉ. अमोल कोल्हे यांची संपत्ती नक्की किती? शेतजमीन, सोनं-नाणं, बँक बॅलन्स आणि बरंच काही..!

पुणे : झुंज प्रतिनिधी : अमोल कोल्हे यांनी गुरुवारी शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीचा तपशील समोर आला आहे. अमोल कोल्हे यांच्याकडे कोणत्या गाड्या? किती शेतजमीन आणि पैसाअडका जाणून घेऊया.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी बुधवारी आपला उमेदवार अर्ज सादर केला. शिरुरची लढत ही राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक मानली जात आहे. याठिकाणी अजितदादा गटाने ऐनवेळी शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना आयात करुन स्वत:च्या पक्षात प्रवेश दिला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर केली. अमोल कोल्हे यांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवार अर्ज दाखल केला. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर अमोल कोल्हे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील त्यांच्या संपत्तीचा तपशील आता समोर आला आहे.

अमोल कोल्हे यांच्या आर्थिक गुंतवणुकीमध्ये विविध बँकांमधील ठेवी आणि शेअर्समधील गुंतवणुकीचा समावेश आहे. अमोल कोल्हे आणि त्यांच्या पत्नीकडे दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने आहेत. तसेच कोल्हे यांच्यावर सध्याच्या घडीला 12 लाखांचे पर्सनल लोन आहे. पत्नी व त्यांच्याकडे मिळून सोन्याचे तब्बल 22 लाखांचे दागिने आहेत. याशिवाय, कोल्हे यांच्या नावावर शेतजमीन आहे. तसेच नारायणगावमध्ये त्यांच्या सदनिका आहेत.

अमोल कोल्हेंची संपत्ती खालीलप्रमाणे

रोख रक्कम
अमोल कोल्हे 40000
अश्निनी कोल्हे 25000

बँकेतील ठेवी

अमोल कोल्हे 18,58,520
अश्विनी कोल्हे 8,24, 951

विविध पतसंस्था आणि शेअर्समधील गुंतवणूक

अमोल कोल्हे 14,87, 193

इन्शुरन्स पॉलिसी

अमोल कोल्हे 22, 20,000
अश्विनी कोल्हे 20,00,000

अमोल कोल्हे यांच्यावर किती कर्ज

अमोल कोल्हे यांच्यावर 12 लाखांचे पर्सनल लोन

अमोल कोल्हे यांच्याकडे असलेल्या वाहनांचा तपशील

मित्सुबिशी पजेरो- 7,42078

टाटा टिएगो- 2,67, 328

रॉयल एनफिल्ड बुलेट- 1,74,934

होंडा अॅक्टिव्हा- 42,595

सोन्यातील गुंतवणूक

अमोल कोल्हे- 5,16, 780

अश्विनी कोल्हे- 16,69, 136

एकूण जंगम मालमत्ता

अमोल कोल्हे 82,39, 505

अश्विनी कोल्हे 48,29, 010

स्थावर मालमत्ता

शेतजमीन- 84,56,683

बिगरशेतजमीन

अमोल कोल्हे- 7,29,62,208

अश्विनी कोल्हे – 7,02,27,000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *