राज्यातील ६ लाख गाय दूध उत्पादकांच्या खात्यांवर, तब्बल ९० कोटींचे अनुदान जमा…

पुणे I झुंज न्यूज : राज्य सरकारने दूध उत्पादकांना गायीच्या दूधाला ५ रूपये अनुदान देण्याचे ठरवले होते. यामध्ये राज्यातील सहकारी दूध संघांना हे अनुदान देण्यात आले आहे. राज्यातील ६ लाख ३०३ दूध उत्पादकांच्या खात्यांवर आतापर्यंत तब्बल ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती राज्य दूग्ध विभागाकडून देण्यात आली आहे.

याचबरोबर राज्याचे दुग्ध सचिव तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दूध अनुदानाचे काम वेगाने व बिनचूक पूर्ण करण्यात आले. आतापर्यंत ९० कोटींचे अनुदान वर्ग झाले, तर उर्वरित अनुदान लवकरच जमा होईल अशी माहिती राज्याचे दुग्ध विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी माहिती दिली आहे.

गायीच्या दूधाचे दर घसरल्यानंतरही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संस्थांनी प्रतिलिटर ३३ रूपये दर देत आहेत. परंतु राज्यातील अन्य ठिकाणी खासगी दूध संघ तर २५ ते २८ रुपये दराने खरेदी करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीतील दूध खरेदीला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार या दोन महिन्यांत शासनाच्या निकषानुसार ६ लाख ३०३ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ३३ कोटी लिटर गाय दूध अनुदानासाठी पात्र ठरले आहे. त्यापोटी १६५ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन महिन्यांत शासनाच्या निकषानुसार ६ लाख ३०३ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ३३ कोटी लिटर गाय दूध अनुदानासाठी पात्र ठरले आहे.

या शेतकऱ्यांना दोन महिन्यांत घातलेल्या दुधापोटी १६५ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळवण्यात पुणे विभाग आघाडीवर राहिला असून, त्यापाठोपाठ नाशिक विभाग आहे. मिळणार असून, त्यापैकी आतापर्यंत १८ कोटी १८ लाख १७ हजार ५ लिटर दुधाचे ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले आहे. उर्वरित अनुदान येत्या चार ते पाच दिवसात मिळणार असल्याची माहिती राज्याचे आयुक्त मोहोड यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *