पुणे I झुंज न्यूज : आयकॉन क्लासेस चा विद्यार्थी साहिल साबळे याचं एमचटी- सीईटी 2023 मध्ये उत्कृष्ट मार्क्स घेऊन, महाराष्ट्रातील एक नंबरचं इंजिनीरिंग कॉलेज सीओईपी व एक नंबर ची ब्रँच कॉम्पुटर सायन्स ला ऍडमिशन झालं आहे. त्यामुळे, विद्यार्थी साहिल साबळे व त्याचे आई -वडील यांचा शाल, बुके व माऊलींची मूर्ती देऊन आयकॉन क्लासेस चे संचालक प्रा. हरीश जगताप सर व सर्व स्टाफ यांनी सत्कार केला.
यावेळी, साहिल ने व त्याच्या आई-वडिलांनी आयकॉन क्लास मधे एमचटी- सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खुप मोलाचे मार्गदर्शन केले व मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सातत्य ठेऊन अभ्यास केल्यास तुमचा पण नंबर सीओईपी कॉलेज ला नक्की लागेल असे बोलून साहिल ने आयकॉन मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.तसेच, विद्यार्थ्यांचे हित जाणून आयकॉन मध्ये सर्व स्टाफ विद्यार्थ्याकडून चांगला अभ्यास करून घेतात व विद्यार्थी सर्वगुण संपन्न व्हावा यासाठी आयकॉन मधील सर्व स्टाफ खुप मेहनत घेतात असे मत साहिल च्या पालकांनी मांडले.
साहिल ला मिळालेलं हे यश बघुन त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. साहिल ची आई बोलत असताना सर्वच विद्यार्थी भावुक होऊन त्यांचे विचार ऐकत होते . परिस्थिती अनुकूल असो वा नसो शिक्षण हे घेतलेच पाहिजे. शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व प्रगती अशक्य आहे असे मत प्रा.हरीश सरांनी मांडले.
आयकॉन क्लासच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी घडत असून, यामुळे पुणे जिल्ह्यात आयकॉन क्लासेस चा गौरव होत असल्याचे प्रा. हरीश सरांनी सांगितले. मागील 11 वर्षांपासून आळंदी व आळंदी परिसरात अत्यल्प दरात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार ज्ञानदानाचं काम आयकॉन क्लासच्या माध्यमातून करत असल्याची माहिती आयकॉन चे संचालक प्रा. हरीश जगताप सर यांनी दिली.
तसेच, आयकॉन मध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट व जेईई परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत फॉउंडेशन घेतले जाते, याची माहिती दिली. मेडिकल व इंजिनीअरिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी आयकॉन मध्ये नीट, एमचटी-सीईटी व जेईई च्या सेपरेट बॅचेस घेत असल्याची माहिती प्रा. हरीश सरांनी दिली.
आळंदीमध्ये दर्जेदार लातूर पॅटर्न राबवत असल्याची माहिती प्रा.हरीश सरांनी दिली. तसेच यापुढील काळात पण लातूर पॅटर्न च्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं शैक्षणिक कार्य सुरु राहील असे प्रा. हरीश सर यांनी सत्कार प्रसंगी सांगितले.