पिंपरी I झुंज न्यूज : परिसराच्या नागरिकांच्या सर्वांच्या एकजुटीच्या ताकदीमुळे जवळपास १० ते १५ वर्षे प्रलंबित असलेला कुदळे कॉलनी १,२,३,४ आणि कुदळे पडाळ क्रमांक १,२,३ मधील विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
युवा नेते सुहास कुदळे व मित्र परिवाराच्या पाठपुराव्याला यश आले असून सामाजिक कार्यकर्ते शशिकांत घुले यांच्या सहकार्याने नुकताच कुदळे कॉलनी परिसरातील २२ के व्ही भुमिगत केबल टाकण्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
यावेळी आमदार अण्णासाहेब बनसोडे, शिवसेना नेते संजोग वाघेरे, युवा नेते सुहास कुदळे व परिसरातील व्यापारी वर्ग व स्थानिक नागरिक तसेच मित्र परिवार या भूमिपूजन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
१० वर्षापासून कुदळे कॉलनी परिसरात विजेची समस्या फार गंभीर होती. सुहास कुदळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि नागरिकांनी विजेची समस्या सुटावी यासाठी वारंवार प्रयत्न व पाठपुरावा केला होता. आज त्या प्रयत्नांना यश आल्यानंतर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.