मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय – मनोज जरांगें पाटील

पुणे I झुंज न्यूज : मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय, असे जरांगे म्हणाले आहेत. या लोकांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. यासाठी मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय . देवेंद्र फडणवीसचे हे षडयंत्र असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माणसे व अजित दादांचे देखील दोन आमदार सामील आहेत, असे आरोप आज मनोज जरांगें पाटील यांनी केले आहे .

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.

मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये. 10 टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे.

मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरु द्यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझं एन्काउंटर करावं लागेल असं फडणवीस यांचं स्वप्न आहे.

अजय बारसकर देखील फडणवीस यांनी उभा केला आहे. मीडियावर दबाव टाकण्यात आले. यात काही समनव्यक सुद्धा आहेत. मला बदनाम करण्यासाठी मुंबईत प्रेस घेतील ,असे आरोप त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *