पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात श्री शिवजयंती उत्सव समिती द्वारे १९ फेब्रुवारी ला ३९५ वी भव्य शिवजयंती साजरी करण्यात आली . या शिवजयंती मध्ये सर्वांत जास्त सहभाग विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासनाने घेतला होता. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय खरात यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पी ई सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य श्री मिलींदभाऊ एकबोटे हे उपस्थित होते.
प्रभु रामचंद्राचे चारित्र्य आणि कृष्णाचे राजकारण यांचा संगम छत्रपती शिवाजी महाराजामधे दिसतो. जगात सर्व ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.शिवाजी महाराजांचे वर्णन करण्यास मराठी भाषेतील शब्दही कमी पडतील . तसेच परिश्रम, विश्वासनीय साथ व कौशल्य याच्या जोरावरती आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. २८ वर्षाच्या कारकिर्दीत ३०० किल्ले अनेक सैनिक व राज्याचा मोठा विस्तार हे लौकिक आहे. अत्यंत प्रामाणिक, निष्ठावंत, शुर जिवाला जीव देणारे सवंगडी त्यांनी तयार केले . तसेच ३९५ वी जयंती न साजरा करताना महाराजांचा वाढदिवस साजरी करीत आहोत असे त्यांनी सांगितले. शिवजयंती उत्साहात साजरी केल्याबद्दल महाविद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
तसेच डॉ श्वेता सावळे इतिहास विभाग प्रमुख यांनी इतिहासाची ओळख करून देताना अनेक उदाहरणांद्वारे महाराजांचा इतिहास, गनिमी कावा, युद्धनिती, दूरदृष्टी व पराक्रम विद्यार्थ्यांसमोर मांडले. तसेच शिवाजी महाराजांना सर्वश्रेष्ठ योध्दा या दृष्टिकोनातून पाहिले जाते शिवाजी महाराजांनी समाजात अनेक विचार प्रेरले त्यातला एक जरी आपण घेतला तरी आपले जीवन सार्थक होईल असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयातील विद्यार्थी ऋतुज चांदेकर व शिवम बाकरे यांनी शिवस्तुतीपर गायन व सिध्देश केसकर याने पोवाडा सादर केले . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ज्योती गगनग्रास यांनी केले व सर्वांचे आभार मानले . शिववंदनाने या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली.