२० फेब्रुवारी पर्यंत लेख पाठविण्याचे आवाहन
मुंबई I झुंज न्यूज : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मनसे विभागध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या पार्थ फाउंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
यानिमित्ताने पार्थ फाउंडेशनच्या सहकार्याने मुबंईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी विनामूल्य ‘मराठी भाषेची चिंता आणि चिंतन’ या विषयावर या विषयावर स्व-बोलीभाषेत कुसुमाग्रज तथा कविवर्य वि वा शिरवाडकर यांना उद्देशून पत्रस्वरूपात राज्यस्तरीय लेख स्पर्धा ‘आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे.
कोणत्याही शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला किमान मातृभाषेत लिहिता वाचता यावं या संकल्पनेच वाटोळं करणारे एक धक्कादायक विदारक चित्र अहवालातून महाराष्ट्रात समोर आले आहे. ते म्हणजे – बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या मुलांचे मराठी वाचता येईना ! त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोसकोसावर बदलणाऱ्या महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे. खेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते, कशीही असो ती ‘मराठी’ च म्हणून मराठी माणसाला आवडते.
“मराठी भाषेची सद्यस्थिती आपापल्या बोलीभाषेत व्यक्त करून स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी ६०० शब्दात लेख लिहावा यावा अशी अपेक्षा आहे, पहिल्या ३ जणांना रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. युनिकोड फॉंट मध्ये टाईप करून दि २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत लेख chalval1949@gmail.com यावर पाठवावेत तसेच स्पर्धेचीअधिक माहिती, नियमावली व आगावू नोंदणी करण्यासाठी स्पर्धा समन्वयक दत्ताराम गवस ९२२०६१५२४५ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर आणि पार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केले आहे.
स्व-बोलीभाषा म्हणजे अस्सल कोल्हापुरी, चंदगडी, आगरी, नागपुरी, मराठवाडी,अहिराणी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी बाणकोटी, कोकणी, वऱ्हाडी, सोलापुरी किंवा महाराष्ट्रात इतर असलेल्या अपेक्षित आहेत.