तुम्ही या राज्यातले समस्त हिंदू विशेषतः संपूर्ण मराठी राजकीय गोंधळात किंवा चक्रव्यूहात अडकला आहात हे मला माहित आहे तसे भारतीय जनता पक्षाच्या मोदी शाह फडणवीस पद्धतीच्या नेत्यांना देखील नेमके माहित आहे, माझे वाक्य अधोरेखित करून ठेवा कि तुमचा अभिमन्यू नक्की होणार नाही फक्त या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभा निवडणूक उलटेपर्यन्त नक्कीच वाट पाहावी लागणार आहे, जे मी तुम्हाला एक महिन्यापूर्वी सांगितले होते तेच काल पर्वा घडले आहे म्हणजे रा स्व संघाच्या जशा विविध मानद संस्था आहेत, बजरंग दल, विश्व् हिंदू परिषद, अखिल भारतिय विद्यार्थी परिषद अशा विविध अनेक पन्नासच्या वर मानद संस्था आहेत त्याच पावलावर पाऊल मोदी यांनी आपल्या या राज्यासाठी मोठ्या खुबीने जेव्हा उचलले तेव्हा तुम्ही महाराष्ट्रातले समस्त हिंदू विशेषतः मराठी पार गोंधळून गेले होते पण हळहळू या गोंधळातून तुम्ही नक्की लवकरच बाहेर पडणार आहात…
संघ पद्धतीने आता महाराष्ट्रात भाजपाच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन मानद संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत, आज मोदी शाह फडणवीस यांनी जशी शिवसेना या मानद संस्थेची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर आणि राष्ट्रवादी या मानद संस्थेची जबाबदारी त्या अजित पवार यांच्यावर त्यांनाच प्रमुख नेमून जशी टाकलेली आहे ती जबाबदारी अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याचकडे असावी असे मोदी यांना वाटत होते त्यादृष्टीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही मन थेट नरेंद्र मोदी जातीने वळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते पण त्या दोघांचाही स्वभाव व वृत्ती संशयी पत्नी सारखी असल्याने नेमके पुढे तेच घडले म्हणजे अति संशयी पत्नी जशी उत्तम नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन उर्वरित आयुष्य एकटी आणि उध्वस्त होऊन जगते एकाकी जगते तेच यापुढे अगदी शंभर टक्के उद्धवजी आणि शरदरावांचे होणार आहे त्या दोघांचेही नेतृत्व अखेरच्या घटका मोजते आहे, नेमका तगडा नवरा नशिबात होता त्याला सोडून लघवी करतांना पाय ओले होणाऱ्या जख्खड वृद्धाशी जशी एखादी वाट चुकलेली स्त्री लग्न उरकून उर्वरित आयुष्य तळमळ करीत जगते तेच नेमके नक्की शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांचेही झाले आहे. शरद पवार यांनी आणि शरदरावांच्या सल्ल्यावरून उद्धव यांनीही वृद्ध गलितगात्र एकाकी कमकुवत काँग्रेस गळ्यात धोंड म्हणून बांधून घेतली आणि आपले आपल्या कुटुंबाचे आपल्या उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांचे पूर्णतः वाटोळे करवून घेतलेले आहे. एखाद्या ऑर्गन फेल्युअर झालेल्या रोग्यासारखे त्या दोघांच्याही नेतृत्वाचे झाले आहे होते आहे जसेकी अलीकडे शरद पवार यांच्याकडे देखील उद्धव पद्धतीने चिन्हासहित उरले सुरले सर्व काही निघते आहे काढल्या गेले आहे अगदी कायद्याने सारे काही घडले आहे, मुख्य म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मैत्रीच्या परतीचे दोर मोदींनी कापून टाकले आहेत, त्याऐवजी अजितदादा आणि एकनाथजी या दोघांच्या केसांवरून मायेचा हात त्यांनी फिरविलेला आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा असे शरद पवार उद्धव ठाकरे बाबत घडलेले आहे…
तुम्हा समस्त हिंदू स्त्रियांना आम्हा पुरुषांच्या मनातले एक गुपित आज याठिकाणी मी उघड करतो, समान नागरी कायदा हे जसे समस्त हिंदूंचे स्वप्न आहे त्यात समान नागरी कायदा आणताना नियमांमध्ये एक बदल घडू नये उलट तो नियम आम्हा हिंदू पुरुषांना देखील लागू करावा व्हावा असे आम्हा हिंदू पुरुषांचे स्पष्ट मत आहे म्हणजे एकापेक्षा अधिक बायका करण्याचा जसा मुस्लिमांना अधिकार आहे तो आम्हा हिंदूंना देखील बहाल करावा अशी सुबुद्धी नरेंद्र मोदी यांना परमेश्वर देवो असे समस्त हिंदू पुरुषांना सतत वाटते, आम्हाला दुसऱ्याच्या ताटातला लाडू नेहमीच मोठा दिसतो, म्हणून एकापेक्षा अनेक विवाह आम्हालाही करता यावेत, जवळपास साऱ्याच हिंदू पुरुषांना सतत वाटते असते. केवळ डी वाय पाटील, दत्ता मेघे, किरीट सोमय्या, केशव उपाध्ये, राधेश्याम मोपलवार, उदय सामंत, विजय दर्डा या पद्धतीच्या बोटावर मोजण्याएवढ्या हिंदू पुरुषांना वाटते असे नाही तर थेट अतुल भातखळकर, श्रीकांत भारतीय, विनोद तावडे, तानाजी सावंत, नाना पाटोले, सुनील तटकरे, उदय तानपाठक त्याचा मित्र यदु जोशी आणि विनायक पात्रुडकर किंवा अगदी अनंत गाडगीळ किंवा नरेंद्र महाराज, अतुल लोंढे किंवा फारसे काही करता न येणाऱ्या सचिन जोशी सारख्या बहुतेक साऱ्याच पुरुषांना एक पत्नी कायदा नसावा असे सारखे वाटत राहते.
सहज गम्मत केली पण रा स्व संघ पद्धतीने त्या नरेंद्र मोदी यांचे देखील अजनबी सिनेमातल्या अक्षय कुमार पद्धतीने सारे काही विथ प्लॅनिंग असते ज्याची फार मोठी तयारी सुरु झालेली आहे आणि एकदा का लोकसभा निवडणूक आटोपली रे आटोपली कि मोदी यांच्या मनातले नेमके व नक्की घडणार आहे जे केवळ हिंदूंना नव्हे तर सुशिक्षित मुस्लिम विशेषतः मुस्लिम स्त्रियांना अगदी मनापासून आवडणार आहे ज्यामुळे भविष्यात नरेंद्र मोदी आणि भाजपाचा देशाच्या कानाकोपऱ्यात मुस्लिम फॅन फॉलोअर खूप मोठ्या प्रमाणात शंभर टक्के वाढणार आहे, आजच हे लिहून ठेवा. समान नागरी कायदा हे भारतीय हिंदूंना पडणारे स्वप्न आणि समस्त मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणून सोडणारे हे सत्य, नक्की घडून येणार आहे, समान नागरी कायदा अमलात आणण्यापूर्वी अजनबी सिनेमातल्या अक्षयकुमार पद्धतीने आता हा कायदा कसा योग्य हे विशेषतः काही पाक वृत्तीच्या मुसलमान पुरुषांच्या मनावर नेमके बिंबवण्यासाठी त्यापध्दतीचा योग्य प्रचार आणि प्रसाराला सुरुवात झाली आहे ज्यात भाजपा आणि संघ विविध माध्यमातून मोठ्या खुबीने समान नागरी कायद्याचे सुपरिणाम समजावून सांगताहेत किंवा पुढल्या काही दिवसात सोशल मीडिया किंवा सर्व प्रकारच्या मीडियातून तुम्हाला ते ऐकायला वाचायला मिळणार आहे.
समान नागरी कायदा आवश्यक कसा किंवा मुस्लिमांच्या देखील फायद्यासाठी भल्यासाठी कसा, हे मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात पुढल्या लिखाणातून बोलण्यातून सांगणार आहे ज्याचा मोठा प्रचार विशेषतः हिंदूंनी त्यांच्या मुस्लिम असलेल्या मित्रांकडे करावा, मी येथे कळकळीचे आवाहन तुम्हाला करतो आहे. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे सामान नागरी कायदा एकदा का अमलात आला कि नागरिकांमध्ये धर्म जात लिंग वंश जन्मस्थान याआधारे भेदभाव करता येणार नाही जी तरतूद आधीपासूनच घटनेत आहे फक्त तिचे पालन होत नाही, हिंदू मुस्लिम हि मोठी दरी खात्रीने कमी होणार आहे…
– तूर्त एवढेच : हेमंत जोशी