शिक्रापूर I झुंज न्यूज : शिरूर येथील बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी प्राचार्य गणेश मिटपल्लीवार यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला. प्रमुख पाहुणे म्हणून लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, निवृत्त कर्नल साहेबराव शेळके, विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब बेंद्रे पाटील, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार, महाराष्ट्र राज्य दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार, कृषी उत्पन्न बाजार शिरूरचे माजी सभापती प्रकाश पवार बबन सोनबा पवार, रेखाताई गणेश कर्डिले, शिल्पाताई गायकवाड, प्राचार्य विनायक म्हसवडे आधी उपस्थित होते.
मोनाली मिटपल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते नववीचे छोटे निवेदक यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य प्रणिता शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य गणेश मिटपल्लीवार, उपप्राचार्य प्रणिता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली माया बेंद्रे, विजया झंजाड, नृत्य शिक्षिका वैष्णवी कांडेकर, संगीत शिक्षक साईनाथ टाळे, टेक्निकल टीम ज्योती जगदाळे, रुपेश देशमुख, समन्वयक माधुरी शिंदे, सोनाली परदेशी, तसेच सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.