नरकेवाडी प्राथमिक शाळेला कॉम्प्युटर भेट व आर्थिक मदत…

पुणे I झुंज न्यूज : नरकेवाडी प्राथमिक शाळेला एनजीओ वॉटर फाउंडेशन जॉन डियर कंपनी यांच्यातर्फे शाळेला तीन कॉम्प्युटर व पाच कॉम्प्युटरचे फर्निच तसेच कॉर्डिनेटर नयना रासकर, विष्णुपंत नरके आणी नरके यांच्या वतीने शाळेला प्राध्यापक हरी नरके यांच्या ग्रंथांची भेट तर डॉक्टर केदारी व डॉक्टर शंकर गायकवाड यांसकडून वाचनालयासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शंकर गायकवाड (अध्यक्ष- लायन्स क्लब ऑफ भोजापुर गोल्ड भोसरी पुणे ) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर साठे (अध्यक्ष,- महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी पुणे ), संदीप वाळुंज -( खजिनदार- लायन्स क्लब ऑफ भोजापुर गोल्ड पुणे) यांची उपस्थिती होती.

यांसोबतच विकास कांतीलाल नरके (प्रदेश उपाध्यक्ष युवक आघाडी सावता सेना महाराष्ट्र राज्य), विशाल नरके, नवनाथ भुमकर, संदीप रासकर, किरण रासकर, गोपाळ भुजबळ, जगन्नाथ नरके, गोपीनाथ नरके यांसह शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ विदयार्थी पालक उपस्थिती होते.

दरम्यान नरके वाडीत हास्य जत्रा मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कर्यक्रमाचा उपस्थितांनी खळखळून हसत आनंद घेतला.

     

    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *