पिंपरी चिंचवड मध्ये सखल मराठा समाजाचा जल्लोष…!

साखर व पेढे वाटून, फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा

पिंपरी I झुंज न्यूज : गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता. त्यासाठी विविध आंदोलने, क्रांती मोर्चे निघाले, पण प्रश्न सुटत नव्हता. गेल्या पाच महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गरजवंत मराठा समाज विविध आंदोलने करत होता. मराठा समाज मुळातच कुणबी आहे. त्यास कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले द्यावेत ही प्रमुख मागणी होती. त्यासाठी सरकारने शिंदे समिती नेमली होती. पण आश्वासने देऊनही प्रश्न सोडवला जात नव्हता. त्यासाठी आंदोलनाचा शेवटचा टप्पा दि. २० जानेवारीला सुरू झाला.

मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईकडे जायला निघाले होते. नवी मुंबईमध्ये आंदोलक पोहोचले, त्यानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. ५७ लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना कुणबी दाखले त्वरित देण्याचे मान्य केले. सगेसोयरे यांना दाखले देण्याचे कबूल केले. सर्व मागण्या जवळजवळ पूर्ण केल्या, त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज सर्वत्र जल्लोष, आनंद साजरा करत आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साखर व पेढे वाटून, फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मागण्या पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानण्यात आले. अत्यंत शांततेत कोणाचाही द्वेष न करता सामाजिक सलोखा राखत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या जल्लोषात शहरातील सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. यावेळी अरुण पवार, सचिन बारणे, प्रकाश जाधव, सतीश काळे, वैभव जाधव, नकुल भोईर, मारुती भापकर, माया बारणे, मीरा कदम, विनायक रणसुभे, कल्पना गिड्डे, वर्षा जगताप, शोभा जगताप, हरेश नखाते, हरीश मोरे, सागर गुजर, सागर बारणे, जीवन बोराडे, वसंत पाटील, गणेश बारणे, पुष्पा शेळके, ज्योती कोकणे, संगीता कोकणे, पौर्णिमा भालेकर, आशा शिंदे, आशा मराठे, मेधा पळशीकर, मोनल शिंत्रे, सपना कदम, अर्चना जाधव, शिल्पा केसवड, संदीप शिसोदे, प्रशांत रणदिवे, सुभाष साळुंखे, निलेश बदाले, मधुसूदन पाडाले, विजय घोडके, दिलीप गावडे, भांदिगरे महाराज, नरसिंग माने, विठ्ठल घोगरे, किरण होले, हरेश शिंदे, अकबर मुल्ला, युवराज पवार, विजय घोडके, धनाजी तांबे, विजय दळवी, शेखर काटे, हनुमंत मोरे, अनिल गव्हाणे, विराज बारणे, अविनाश येवले, राजू चांदणे, सुनील अडागळे, अजय खानेकर, रमेश कदम, वाल्मीक माने, सर्जेराव पाटील, निखिल गणुचे, रावसाहेब गंगाधरे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *