मावळ I झुंज न्यूज : डॉ डी वाय पाटील युनिटेक सोसायटीचे, डॉ डी वाय पाटील युनिटेक कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय ताथवडे येथील विद्यार्थ्यांचा यांचा हिवाळी शिबिर (NSS) ची’ उत्साहात सुरुवात झाली..
कार्यक्रमासाठी डॉ. अरविंद पाटील, प्राचार्य पी.वासुदेवन, गावचे सरपंच बाळासाहेब घोटकुले, ग्रामसेविका, देवेंद्र घोटकूले, दामिनी पथकाच्या प्रमुख कॉन्स्टेबल गायकवाड मॅडम, आढले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वाढवणे सर, माळी मॅडम, कांबळे सर, आरोग्य केंद्रातील डॉ दिलीप सुर्यवंशी, रोहीदास शेट, उद्योजक दत्तात्रेय घोटकुले उपस्थित होते.
प्रा.शितोळे सरांनी कार्यक्रमाचा हेतु व उद्देश प्रस्ताविकाद्वारे स्पष्ट करून दिला. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.देसाई सर यांनी करून दिला. दामिनी पथकाच्या प्रमुख कॉन्स्टेबल गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मुलांना स्वतः घ्या पायावर उभा राहण्यास सांगितले, शिक्षणाचे जिवनातील महत्त्व पटवून दिले.
प्राचार्य पी. वासुदेवन यांनी शिबिराचे जिवनातील महत्त्व पटवून सांगितले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.ॲकाडमिक हेड डॉ.अरविंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटिल युनिटेक सोसायटीचे चेअरमन डॉ. पी. डी. पाटील, व्हा.चेअरमन डॉ. भाग्यश्रीताई पी. पाटिल, सेक्रेटरी डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. स्मिता जाधव, डॉ. यशराज पाटिल यांचे मार्गदर्शन लाभले.
गावचे सरपंच यांनी आपल्या उपदेशपर भाषणात गावाचे निसर्ग वैभव समजून सांगितला व सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.देवेंद्र देसाई सरांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक NSS चे प्रमुख प्रा. शितोळे सरांनी केले तसेच आभार प्रा.दिलीप वाघमारे मानले.