रांजणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन साजरा…

शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील जि.प.प्रा शाळा रांजणगाव येथे प्रजासत्ताक दिना निमित्त प्रभातफेरी ध्वजारोहन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. प्रा .शाळेत ध्वजारोहन कार्यक्रम रांजणगाव गणपती येथील नवनिर्वाचीत उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश पाचुंदकर पाटील यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी मुख्या श्री .थोरात सर , श्री वेताळ सर , श्री . वाळके सर, श्री चव्हाण सर , श्री डहाळे शाळा समितीचे कैलास बत्ते, दुंडे यांसह सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेत ध्वजवंदन झालेनंतर ग्रामपंचायत येथे सरपंच सुवर्णा वायदंडे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . नंतर प्रा .शाळेत १ ली ते ५ वी पर्यंत सर्व वर्गाचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रम उदघाटन सरपंच सुवर्णा वायदंडे तसेच मुख्या थोरात सर , श्रीकांत पाचुंदकर उपसरपंच , शाळा समिती अध्यक्ष उमेश पाचुंदकर पाटील सर्व शाळा समिती सदस्य ग्रा .प .सदस्य पालक शिक्षक विद्यार्थी यांचे उपस्थितीत संपन्न झाला .

यावेळी प्रास्ताविक संजयकुमार वाळके सर यांनी केले . ग्रा.प .सदस्य नेताजी फंड यांनी आपले विचार व्यक्त केले . यानंतर ९ ते १२ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला . शेतकरी गीते देशभक्तीपर गीते मराठमोळी राष्ट्रभक्ती , शिवाजी महाराज धार्मिक गीत व डान्स घेण्यात आले .

सांस्कृतिक कार्यक्रम सूत्रसंचालन उत्कर्षा वाळकेव श्री संजयकुमार वाळके यांनी केले. मागदर्शक शिक्षिका वेताळ मॅडम, थोरात मॅडम, खैरे मॅडम, वाळके मॅडम , घोडे मॅडम , थोरे मॅडम , गायकवाड मॅडम , कारखिले मॅडम, शिंदे मॅडम, अनुराधा जगताप , योगीता जगताप मॅडम यांचे वतीने मुलांचे डान्स नियोजन मार्गदर्शन केले . प्रसिद्ध निवेदक रोहिदास खेडकर यांनी निवेदक म्हणून काम केले, आभार प्रदर्शन श्री . वेताळ सर यांनी केले व कार्यक्रम समारोप करण्यात आला. यावेळी पालक व ग्रामस्थ यांनी आर्थिक रूपाने भरभरून सहकार्य केले .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *