शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी, शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना, प्रभू श्रीराम यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्याच्या निषेधार्थ शिरूर तालुक्यातील शिक्रापूर – चाकण चौकात, भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
सोनवणे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, यांनी हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या बद्दल जे बुद्धिभेद करणारे वक्तव्य केले, त्याच्या निषेधार्थ शिक्रापूर येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देत व आव्हाड यांची प्रतिमा असलेले छायाचित्र जाळून निषेध करण्यात आला.
त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनालाही अव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन शिरूर भाजप च्या वतीने करण्यात आलेय. गुन्हा दाखल न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी भाजपच्या वतीने सांगण्यात आलेय.