– वाबळेवाडी शाळेत विजय वडवेराव यांच्या कवितांचे सादरीकरण
शिरूर I झुंज न्यूज : येथील उपक्रमशील शाळा वाबळेवाडी येथे बालिका दिनाच्या निमित्ताने मोबाईलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडांबे वाडी नं.१ ,केंद्र रिहे शाळेची संपर्क करत तेथील साहित्यिक शिक्षक विजय वडवेराव यांच्या कवितांचे सादरीकरण झाले. अप्रतिम रचना, आवाजातील माधुर्य, आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या शब्द सुरांचा संगम यामुळे उपस्थित सर्वांनी टाळ्यांनी प्रचंड दाद दिली. यावेळी त्यांच्या भिडेवाडा बोलला ही त्यांची कविता ऐकून वाबळेवाडीचे विद्यार्थी भारावून गेले.
यावेळी कवी विजय वडवेराव यांनी मुलांना मार्गदर्शन करत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा पट उलगडून सांगितला. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. तसेच त्यांच्या साहित्यिक कार्याचा परिचय करून देत काव्य फुले या काव्यसंग्रहाविषयी देखील त्यांनी आवर्जून माहिती दिली.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन व शिष्यवृत्ती तज्ञ विजय गोडसे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, विद्या सपकाळ, वैशाली जगताप, गितांजली वाघोले आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.
तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, माजी सरपंच केशव वाबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अंकुश वाबळे, सतिश वाबळे, सुरेखा वाबळे, सतिश कोठावळे, प्रकाश विठ्ठल वाबळे, भगवान वाबळे, खंडू वाबळे, काळूराम वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन बेंडभर यांनी केले. स्वागत विजय गोडसे तर आभार किरण अरगडे यांनी मानले.