जागृत नागरिक महासंघाची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी जागृत नागरिक महासंघाच्यावतीने (माहिती अधिकार प्रचार प्रसार प्रशिक्षण समिती
पिंपरी चिंचवड) करण्यात आली आहे.
मनपाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणारे गंभीर हल्ले तसेच विविध क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे नागरिकांबरोबरचे असौजन्यशील वर्तन यावर चाप बसावा व एखादी दुर्घटना घडली तर पोलिसांना योग्य पद्धतीने शोध घेता यावा यासाठी जागृत नागरिक महासंघाने मा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे पिंपरी चिंचवड मनपाच्या मुख्य इमारतीसह सर्व अ ब क ड इ फ ग ह क्षेत्रीय कार्यालयातील सर्व विभागात तसेच ज्या अधिकाऱ्यांना केबिन दिलेली आहे त्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निवेदन दिलेले आहे.
या निवेदनानुसार आयुक्त निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतील अशी महासंघाला खात्री वाटते. असा विश्वास संघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी व्यक्त केला आहे.