रिक्षा चालकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व रिक्षा स्टँडवर बोंबा बोंब आंदोलन होणार : कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा इशारा

पिंपरी I झुंज न्यूज : रिक्षाचालकांच्या प्रमुख मागण्या

१) रिक्षा चालकांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिना दहा हजार मिळावे.

२) शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे त्यांची आर सी बुक कोरे करावे.

३) मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, ओला उबेर वर निर्बंध आणावेत.

४) रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.

५) फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वतीने हप्ते वसुली साठी रिक्षा चालकांना त्रास दिला जात आहे, याबाबत सक्त वसुली आणि गुंडागर्दी दादागिरी करू नये असे आदेश सरकारने संबंधित सर्व फायनान्स आणि बँकांना द्यावेत.

६) रिक्षा चालक मालकांसाठी घरकुल योजना राबवावी.

७) रिक्षा चालक मालकांसाठी covid-19 च्या काळात ५० लाखाचा विमा मिळावा.

  

या प्रश्नांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्याचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन होणार आहे. या आंदोलनात पुणे शहरातील सर्व रिक्षा स्टँडवर हे आंदोलन करण्यात येणार असून बोंबा बोंब आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय पुणे शहरातील रिक्षा चालकांनी घेतला आहे.

या बाबत पुणे विश्रांतवाडी येथे रिक्षा चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला, या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे सामाजिक कार्यकर्त्या अनिता साळवे, पुणे शहर कार्याध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अशिद अन्सारी, रहीम सय्यद, फरहान शेख , आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र रिक्षा पंचायत खजिनदार सुहास कदम, आनंद रिक्षा स्टँड अध्यक्ष गणेश थोरात, अरिफ पटेल, राजेश शिंदे, किरण एरंडे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *