कवी वादळकार यांच्या “ह्रदयाचे न बोलणारे ठोके” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन…

पुणे I झुंज न्यूज : कवी वादळकार यांच्या “ह्रदयाचे न बोलणारे ठोके”या काव्यसंग्रहाचे पुणे विद्यापीठात प्रकाशन झाले. नक्षञाचं देणं काव्यमंचचे संस्थापक-राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे अर्थात कवी-वादळकार यांचे हे आठवे पुस्तक आहे. “ह्रदयाचे न बोलणारे ठोके”या दर्जेदार काव्यसंग्रहाच्या प्रकाशनचा सोहळा साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ येथिल मराठी विभागात हा आनंदी वातावरणात हा सोहळा रंगला.

मराठी विभागाचे विभागप्रमुख डाॅ.प्रा.तुकाराम रोंगटे यांच्या शुभहस्ते कवी वादळकार यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले.यावेळी विद्यापीठातील मराठी विभागातील विद्यार्थी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.त्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.

याप्रसंगी डाॅ.प्रा.तुकाराम रोंगटे म्हणाले,”कोणत्याही लेखकाला,कवीला व साहित्यिकाला आपले पहिले पुस्तक अर्थात आपले पहिले अपत्य जन्माला आल्यावर त्याची उत्सुकता असते.त्यानंतर त्या साहित्यिकाने पुढे आपले लेखन सातत्यपूर्वक करावे म्हणुन सर्वांनी प्रोत्साहान देण्याची गरज असते.त्यातुन मग अनेक प्रकारचे लेखन पुढे लिहिण्याची प्रेरणा मिळते.कवी वादळकार यांनी अनेक प्रकारचे साहित्य निर्माण केलेले आहे. साहित्य व काव्यक्षेञात त्यांची घौडदौड सुरुच ठेवली आहे.म्हणुनच आज त्यांच्या आठव्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.

कवी वादळकार यांच्या “ह्रदयाचे न बोलणारे ठोके”या काव्यसंग्रहाच्या दुस-या आवृत्तीच्या प्रकाशनाला आमच्या सदैव शुभेच्छा आहे. त्यांनी काव्यक्षेञात अनेक वर्षे काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.या काव्यसंग्रहाची निर्मिती अतिशय देखनी केलेली आहे.तसेच त्यांच्या या काव्यसंग्रहातील कविता वाचकांना भूरळ घालणा-या आहेत.विविध विषयांना स्पर्श करणा-या कविता आहेत.वाचकांनी या काव्यसंग्रहाचे जोरदार स्वागत करावे.भविष्यात त्यांच्याकडून अशाच प्रकारचे साहित्य निर्माण होऊन त्यांच्या हातून मायमराठीची सेवा घडावी.त्यांच्या लेखनीला व कार्याला सदैव शुभेच्छा..!” 

यावेळी कवी वादळकार यांच्या काही रचनांचे सादरीकरण झाले.त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. यापुर्वी कवी वादळकार यांनी अनेक साहित्याची निर्मिती केलेली आहे.त्यात “वादळाची अशांतता”,”मनातील वादळ”,”वादळाचे घोंगावण”, “वादळ”, “वावटळ”या चारोळी काव्यसंग्रहा बरोबर त्यांचा “आसक्या”,हा ग्रामिण कथासंग्रह ही प्रकाशित आहे.त्यांचे सुवचनांचे”सुविचार संग्रह २०२०”,सुध्दा प्रकाशित यापुर्वी झालेले आहे.या सर्व पुस्तकांच्या अनेक आवृत्यासुध्दा निघालेल्या आहेत.यापुर्वी त्यांनी इतरांच्या ९५ पुस्तकाचे सुध्दा प्रकाशन केले आहे.त्यांची वाचकांच्या भेटीला अनेक पुस्तके लवकरच येणार आहेत.त्यांचा साहित्यांचा वाचक,चाहत वर्ग मोठा आहे. यावेळी कवी वादळकार यांच्या पुढील कार्याला उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

         

FacebookTwitterLinkedinPinterestWhatsappYoutube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *