थेरगाव I झुंज न्यूज : आपल्या महाराष्ट्राला अनेक सणांच्या परंपरेचे लेणं लाभलेलं आहे. परंतु काळानुसार या परंपरा मागे पडत आहेत. आजच्या पिढीला त्याचे ज्ञान व्हावे यासाठी प्रेरणा शिक्षण संस्था, थेरगाव या ठिकाणी आज महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले.
प्रेरणा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तशालिनीताई कांतीलालदादा गुजर, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. पवळे के. डी. सर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. पवार एम. डी. सर यांच्या हस्ते प्रतीकात्मक सरस्वती आणि गजलक्ष्मीचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात जगताप मॅडम यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने नवरात्री सणाचे महत्त्व सांगितले. यानंतर सर्व मुली व शिक्षकांनी फेर धरून भोंडल्याची गाणी म्हटली. शालिनीताई गुजर अत्यंत उत्साहाने यामध्येही सहभागी झाल्या. त्यामुळे नवरंगाच्या या नवरात्र उत्सवाला आणखीनच शोभा आली.
या भोंडल्याचे आयोजन सर्व महिला शिक्षिकांनी केले होते. सूत्रसंचालन उबाळे सर यांनी केले. तसेच इतर सर्व शिक्षकांची देखील खूप मदत झाली. माळी सर यांनी नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर पद्धतीने या सोहळ्याची क्षणचित्रे टिपली.