थेरगाव मध्ये पुण्यातील पहिली पिकलबॉल स्पर्धा संपन्न…

क्रिक फिटनेट ॲकॅडमी आणि ठाकरे पिकलबॉल ॲकॅडमीतर्फे आयोजन

थेरगाव I झुंज न्यूज : क्रिक फिटनेट ॲकॅडमी आणि ठाकरे पिकलबॉल ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील पहिली पिकलबॉल स्पर्धा थेरगाव येथील क्रिक फिटनेट ॲकॅडमीच्या कोर्टवर मोठ्या उत्साहात पार पडली.

प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या पिकलबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन अजय चौधरी, साई पारकर, वृषाली ठाकरे आणि विक्रम भोसले यांनी उत्कृष्टरित्या केले होते. अविस्मरणीय क्षण, अतुलनीय खिलाडूवृत्ती आणि अपवादात्मक विजेत्यांची एक लांबलचक यादी देऊन या पिकलबॉल स्पर्धेने इतिहास रचला. अशा भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.

यावेळी प्रतिष्ठित असलेला ’प्लेयर ऑफ टूर्नामेंट’ अवॉर्ड साई पारकर यांना देण्यात आला. साई यांनी अनोखे कौशल्ये आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करत विविध श्रेणींमध्ये 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक पटकावले.

हि स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फ्रँकलिन पिकलबॉल कंपनी (ऑफिशियल बॉल पार्टनर), एनर्जल (गुडीज पार्टनर), ग्लायडर्झ (गिफ्ट हॅम्पर पार्टनर) तसेच ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन (एआयपीए), एआयपीए व एआयपीए चे अध्यक्ष अरविंद आर प्रभू आणि महाराष्ट्र पिकलबॉल असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आजची जीवनशैली पाहता निरोगी राहण्यासाठी आणि चपळता वाढवण्यासाठी ‘पिकलबॉल हा खेळ आवर्जून खेळला जातो. ‘पिकलबॉल या खेळाने अमेरिकेत लोकप्रियता गाठली असून भारतातही तो लोकप्रिय होऊ लागला आहे. या खेळाला टेनिस, बॅडमिंटन आणि पिंगपॉंगप्रमाणे लोकप्रियता लाभत आहे.

विजेत्या स्पर्धकांची नावे

14 वर्षांखालील मुले एकेरी
सुवर्ण – श्रेयस राजाराम
रौप्य – अव्यय राठी
कांस्य – अव्यूक्त बच्चुवार

महिला खुल्या दुहेरी
सुवर्ण – श्वेता प्रभुगावकर आणि उषा त्रिवेदी
रौप्य – गीत पारकर आणि वंदना विश्वकर्मा
कांस्य – स्नेहल भोसले आणि तनुजा टी

महिला एकेरी
सुवर्ण – श्वेता प्रभुगावकर
रौप्य – उषा त्रिवेदी
कांस्य – गीत पारकर

३५ पुढील वयोगट पुरुष एकेरी
सुवर्ण – साई पारकर
रौप्य – अद्वैत बच्चुवार
कांस्य – हणमंत धोत्रे

३५ पुढील वयोगट पुरुष दुहेरी
सुवर्ण – नागमणी कुमार आणि अरविंद कुमार
रौप्य – साई पारकर आणि गजेंद्र चौहान
कांस्य – हणमंत धोत्रे आणि रविंदर कुमार

एकल खुल्या
सुवर्ण – सेश्‍वर झांझोटे
रौप्य – श्रेयस राजाराम
कांस्य – साई पारकर

ओपन डबल्स
सुवर्ण – साई पारकर आणि विवेक फसाटे
रौप्य – सेश्‍वर झांझोटे आणि कृष्णा बजाज
कांस्य – आदित्य पाटील आणि अद्वैत बच्चुवार

उभरते खेळाडू
रेयान्स गुप्ता
विदान भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *