पुणे I झुंज न्यूज : ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ स्पर्धेत पुणे फेस्टिवल फिरता करंडक’ डॉ. डी वाय पाटील, ए सी एस कॉलेज, पिंपरी,यांनी पटकावला. कॉलेजतर्फे संगीत विभागाच्या प्रमुख प्रा.अनिता सुळे, आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.एस. एम. कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या जल्लोषात हा करंडक स्विकारला.
३५ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ या तेराव्या सुगम संगीत स्पर्धेचे उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिर येथे दि २५ रोजी सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश चंद्रचूड व विश्वजीत जोशी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ गायिका विदुषी मंजिरी आलेगावकर, सुप्रसिद्ध संगीतकार साई निंबाळकर व पियुष कुलकर्णी आणि गझल गायक डॉ. अविनाश वाघ यावेळी उपस्थित होते. याचे संयोजन अनुराधा भारती यांनी केले होते.
‘व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल’ ही हिंदी सुगम संगीत स्पर्धा चार वयोगटात घेतली गेली. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रुती करंदीकर, गझल गायक डॉ. अविनाश वाघ व ज्येष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रसिद्ध संगीतकार अविनाश विश्वजीत या जोडीने अंतिम फेरीसाठी परिक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत ४०० हून अधिक गायक – गायिका आणि अनेक महाविद्यालयांनी भाग घेतला होता. त्यांची प्राथमिक फेरी झाल्यानंतर अंतिम फेरी काल संपन्न झाली.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल पुणे फेस्टिवल चे आयोजक अध्यक्ष, माजी मंत्री श्री सुरेश कलमाडी, उपाध्यक्ष श्री.कृष्णकुमार गोयल, फेस्टिवलच्या आयोजिका ॲडव्होकेट अनुराधा भारती यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालय संस्थेच्या वतीने युनिटेक सोसायटी संस्थेचे सचिव डॉ.सोमनाथ पाटील, सीईओ डॉ. अविनाश ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील. उपप्राचार्य डॉ. किशोर निकम, उपप्राचार्य प्रा. जे.एम. बाबर.यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.