नामवंत गोंधळी कलावंताचे सादरीकरण सर्वांसाठी खुले ; सहभागी होण्याचे आवाहन
लातूर I झुंज न्यूज : गोंधळी समाजाचे प्रश्न हेच पारंपरिक लोककलावंतांचे प्रश्न आहेत म्हणून दि.१ ऑक्टोबर रोजी लातूर येथील दयानंद महाविद्यालय सभागृहात ’गोंधळी समाज अधिवेशना’त राज्यभर पारंपरिक लोककलावंतांच्या प्रलंबित न्याय मागण्यासाठी जनजागृती अभियानाचा शुभारंभ होणार आहे.
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन सत्रात आई जगदंबेची गोंधळ जागरण विधीवत पुजा व दिवटी प्रज्वलित करुन करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून क्रिडा युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ.अमित देशमुख, आ. राणा जगजीतसिंह पाटील, आ.अभिमन्यू पवार हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे आणि प्रदेश अध्यक्ष राजेंद्र गायकवाड (तुळजापूर) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे.
देव, देश आणि मानवतेची शिकवण देणारे धर्मपंथाचे उपासक आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धक असलेले गोंधळी यांना लोकाश्रय व राजाश्रय मिळावा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन लातूर येथील ’गोंधळी समाज अधिवेशनात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील गोंधळी समाज नेतृत्वास यावेळ प्रमुख पाहुणे म्हणून आणि त्याप्रसंगी लातूर व धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केले आहे.
गोंधळी समाज अधिवेशनात गोंधळी समाजातील नामवंत गोंधळ गीत सादर करणारे लोककलावंत आपल्या कलापथकासह सहभागी होणार आहेत. या सर्व कलापथकांचे सादरीकरण करण्यात येणार असुन ते पाहण्यासाठी हे अधिवेशन सर्व पारंपारिक लोककलावंत, भटक्या जमातीतील तसेच सर्वसामान्य जनतेसाठी खुले आहे. याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
या अधिवेशनात केंद्र व राज्य सरकारकडे गेली ७५ वर्ष न्याय मागण्यांच्या स्वरूपामध्ये गोंधळी समाज म्हणून आम्ही सकारात्मक विनंती केली असता अजुनही आमचे प्रश्न प्रलंबीत आहेत. त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये केंद्र व राज्य सरकारकडे गोंधळी आणि पारंपारिक लोककलावंत तसेच गोंधळी आणि भटक्या जमाती यांच्या न्याय मागण्यांचे निवेदन ठरावाद्वारे विषय मांडून करण्यात येणार आहे. या मागण्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रमुख मान्यवरांनी सकारात्मक प्रयत्न करावेत यासाठी विनंती करण्यात येणार आहे. या अधिवेशनास महाराष्ट्रातील भटक्या जमाती आणि गोंधळी समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी विशेष निमंत्रीत म्हणून निमंत्रीत करण्यात आले आहे. संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेशराव ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन बैठक या अधिवेशनातील तिसर्या सत्रात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा निश्चीत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती या पत्रकात गोंधळी समाज अधिवेशन संयोजन समितीने दिली आहे.
या अधिवेशनास गोंधळी समाज बंधु-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीचे राजेंद्र वनारसे, राजेंद्र गायकवाड, सुरेशराव ढवळे, भिमराव तोरखडे, अॅड.दत्तात्रय घोगरे, दिपक वाडेकर, संतोष भोरे, श्रीकांत रसाळ, विजय मोरे, दत्तात्रय पाचंगे, तुकाराम बडगे, भगवान(राजु) धुमाळ, शाहीर रतीकांत घोगरे, बालाजीराव शिंगणार, दिगंबर ढवळे, लक्ष्मीकांत इंगळे, बालाजी इंगळे, विजयकुमार ढवळे, सुनिल पाचंगे, चंद्रकांत इगवे, लक्ष्मण रेणके, दत्तात्रय जाधव, जयंत वाडेकर, सुनिल पाचंगे, उमेश उघडे, गणेश बडगे, कृष्णा भांडे, गणेश गरूड, अजीत रेणके, मधुकर पाचंगे, धनाजी बडगे, प्रमोद शिंगणार, कोंडीराम पाचंगे, उमाकांत इगवे, कमलाकर मिरगे, राजेंद्र पाचंगे, श्रावण वाडेकर, राजु पाचंगे आदिंनी केले आहे.