- माधव पाटील
अध्यक्ष – अंघोळीची गोळी 💊Bath Pill
(पर्यावरणासाठी झटणारी एक सामाजिक संस्था )
मोबा -7720923510
हि आहे गिफ्ट. या आफ्रिकेच्या तरुणीचे नावच गिफ्ट आहे. ज्याप्रकारे तिने गोळीचा हा बोर्ड धरून मिरवला आहे, त्यातून तिचा आत्मविश्वास दिसत आहे. दुष्काळ आफ्रिकेच्या पाचवीला पुजलेला असल्यामुळे पाणी बचतीचे महत्व तिला समजले आहे. त्यामुळेच कि काय हा दुष्काळ उच्चाटन करण्यासाठी तिची लीडरशीप करण्याची छापसुद्धा या फोटोत दिसत आहे. पण हे सगळे आले ते तिच्या आफ्रिका खंडात वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे. तिने ती परिस्तिथी पहिली आहे, अनुभवली आहे. अपुऱ्या अन्नपाण्यामुळे अनेक मृत्यू तिने ऐकले,वाचले आणि पाहिलेही आहेत. या दुष्काळाने अनेक लहान मुले कुपोषणामुळे दगावली आहेत. अनेक मुलींनी शाळेचे दरवाजेसुद्धा पहिले नाहीत.अशा परिस्तिथीमध्ये हि ‘गिफ्ट’ नावाची मुलगी एका नव्या आशेने अंघोळीची गोळीकडे पाहत आहे, सोबत काम करत आहे.
गोळीने सांगितले कि, आम्ही करोडो रुपयांच्या योजनांची स्वप्ने दाखवत नाही. सरकारने काय करायचे काय नाही ते आपले काम नाही. गोळी सांगते कि वैयक्तिक ” मी ” आपल्या माणसांसाठी, आपल्या पृथ्वीसाठी काय करू शकतो. जगातला प्रत्येक ” मी ” एक अंघोळीची गोळी घेउ शकतो. हो , ठरवून एक दिवस अंघोळ टाळू शकतो. यातून पाणी वाचेल, वीज वाचेल, लाकूडफाटा वाचेल, CO२ चे उत्सर्जन कमी होईल आणि हवामान ठोसा दिला जाईल. हवामानठोसा म्हणजेच Climate Action. गोळी घेतलीच पाहिजे हा अट्टाहास नाही पण कोणाच्यातरी जीवनात आनंद फुलवणे हे त्या मुलीला , गिफ्टला समजले, भावले.
काही मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ती ‘ गिफ्ट’ अंघोळीची गोळीचा (Bath Pill ) चा प्रचार प्रसार आफ्रिका खंडात नक्की करेल यात काही शंका नाही. म्हणूनच तर ज्याप्रकारे ती या फोटोत आपला “पॉसिटीव्ह ऍटिट्यूड” दाखवत आहे तो अंघोळीची गोळी टीमला एक नवी ऊर्जा देणारा आहे. आमच्यासाठी ‘गिफ्ट’ गोळीची ब्रड अंबेसेडॉर च आहे.
एकच सांगेन God gifted us ‘Gift’ to make Earth free from Climate Change and make Happy Earth.
आपणही आहात ना ‘गिफ्ट’ सोबत,
टीम अंघोळीची गोळीसोबत,
अहो आपल्या आनंदी पृथ्वीसोबत ?
अंघोळीची गोळीत आपले स्वागत आहे, सोबत काम करूया आणि आनंदी पृथ्वी बनवूया…
अंघोळीची गोळी 💊Bath Pill
( पर्यावरणासाठी झटणारी एक सामाजिक संस्था )
> माधव पाटील – अध्यक्ष –
मोबा : ७७२०९२३५१०
> अविनाश – समन्वयक, महाराष्ट्र राज्य
मोबा : ८०८०१७१४३०
#HappyEarth