पुण्यातील महागणपतींची मोरया कलावंतांच्या हस्ते महाआरती….

पुणे I झुंज न्यूज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊसाहेब रंगारी गणपती, शारदा गजानन मंडई गणपती, कसबा मानाचा पहिला गणपती, तुळशीबाग गणपती, गुरुजी तालीम गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, केसरी वाडा गणपती व दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील सिनेकलाकार व तंत्रज्ञ मोठ्या संख्येत हजर राहून मराठी चित्रपटास चित्रपटगृहात प्राईम टाईम मिळो व चित्रपट निर्मात्यांच्या मार्फत नवनवीन चित्रपट घडो व मराठी चित्रपट जगाच्या इतिहासात नोंद व्हावी असे कलाकारांनी बाप्पा चरणी नतमस्तक होऊन साकडे घातले व महाआरतीचा लाभ घेतला.

 

महाआरतीचे आयोजन मोरया कलावंत च्या संस्थापक कुणाल देशमुख, श्रीकृष्ण भिंगारे, प्रशांत बोगम, शुभम मोरे, शरद पाटील, राज चमरे आदी यांनी केले असून महाआरती करीता प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता गायक उत्कर्ष शिंदे, ज्येष्ठ अभिनेते सुनील नाना गोडबोले, अभिनेते मिलिंद दास्ताने, अभिनेत्री आर्या घारे, अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर, अभिनेता गंधार खरपुडीकर तसेच रश्मी दहिरे, आशिष जैन, ओमकार साखरे, सुमया पठाण, काजल पाटील, सायली शिंदे,अविनाश सकुंडे, आर्या घोलप, प्रियांका कुकाडे, हर्षल पवार, विजया क्षीरसागर, प्रणव देवधर असे ५० हुन अधिक चित्रपट व मालिकातील कलाकारांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.

     

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *