धक्कादायक ! सौदी अरेबियात महिलांची विक्री ; पुणे पोलिसांकडून मानवी तस्करीचे रॅकेट उघड…

पुणे I झुंज न्यूज : दोन दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाने पुणे शहरातील तीन महिलांची सौदी अरेबियातून सुटका केली होती. या महिलांना नोकरीचे आमिष दाखवून सौदीत नेले होते. त्या ठिकाणी त्यांचा छळ केला जात असल्याचा प्रकार उघड झाला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने त्या तीन महिलांची सुटका झाली होती. हे प्रकरण ताजे असताना पुणे शहरातून मानवी तस्करीचे रॅकेट उघड झाले आहे. पुण्यातून सौदी अरेबियात महिलांची विक्री होत होती. या प्रकरणी सूत्रधारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काय होता प्रकार
राज्यातील महिलांची सौदी अरेबियात विक्री होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या प्रकरणात एम. फैय्याज ए. याह्या याला मुंबईत अटक केली आहे. तो बेंगळुरु येथील रहिवाशी आहे. याह्या हा त्याचे पाच सहकाऱ्यांसोबत मानवी तस्करी करत होता. त्याचे सहकारी अब्दुल हामिद शेख, हकीम, रहीम आणि शमीमा या फरार आहेत.

नोकरी लावण्याचे आमीष
आरोपी नोकरी लावण्याचे लालच देऊन महिलांना सौदी अरेबियात पाठवत होते. पोलीस निरीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले की, मुंबईतील आरोपींच्या ए.ए. एंटरप्राइजेवर छापा टाकला. या कंपनीमार्फत महिलांची भर्ती करुन ते सौदीत पाठवत होते. पोलिसांनी याच ठिकाणी एम. फैय्याज ए. याह्या याला अटक केली. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *