सांगवी I झुंज न्यूज : सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष/पदाधिकारी, शांतता समिती. मोहल्ला कमिटी, महिला दक्षता कमिटी, पोलीस मित्र तसेच प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी यांची बैठक रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव येथे घेण्यात नुकतीच आली.
याप्रसंगी पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष विशाल बिभीषण क्षीरसागर यांच्या हस्ते सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोळ साहेब यांना संविधान देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर मिटींगला शांतता समिती सदस्य, महीला दक्षता कमिटी, मोहल्ला कमिटी पोलीस मित्र तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष/ पदाधिकारी व 100 ते 150 कार्यकर्ते हजर होते. बैठकचे आभार प्रदर्शन समाजसेवक विशाल जाधव यांनी केले.
➡️ सदर बैठकीत मिरवणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होऊ नये, याअनुषंगाने योग्य त्या मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या.
➡️ रहदारीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याकरिता जास्तीत जास्त ओळखपत्रसह स्वयंसेवक नेमावे.
➡️ मंडळातर्फे आक्षेपाह देखावे लावू नये, जबरदस्तीने वर्गणी आक्षेपार्य घोषणाबाजी गाणे वाजवू नये याबाबत सूचना देण्यात आल्या.
➡️ विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीम, डिजे/ डॉल्बीचा वापर करणार नाहीत.
➡️ सर्व परवाने घेऊनच उत्सव साजरा करावा.
➡️ तसेच सुरक्षिततेच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करणेबाबत गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आहे .