मुंबई । झुंज न्यूज : मराठी पत्रकार परिषदेचे भूतपूर्व राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन यांची मराठी पत्रकार परिषदेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.. संघटना विरोधी कारवाया केल्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी स्पष्ट केले..
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने अनिल महाजन यांची विभागीय अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती करण्यात आली होती.. आज अध्यक्ष निवडीसाठी छत्रपती संभाजीनगरला बैठक होती.. या बैठकीच्या अनुषंगाने परिषदेने काही सूचना अनिल महाजन यांना केल्या होत्या मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून विरोधकांशी हात मिळवणी केली.. त्यांची ही कृती संघटनेला बाधा आणणारी,संघटना विरोधी असल्याने त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. अनिल महाजन यांचे बीड जिल्हा पत्रकार परिषदेचे प्राथमिक सदस्यत्व देखील रद्द करण्यात आल्याने यापुढे अनिल महाजन यांचा मराठी पत्रकार परिषदेशी कसलाही संबंध उरलेला नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असेही शरद पाबळे यांनी पत्रकात म्हटले आहे..