बाप्पाझ स्टुडिओ फिल्म्स निर्मित “शॉर्टकट” लघुपटाचे पोस्टर प्रकाशन

पिंपरी I झुंज न्यूज : बाप्पाझ स्टुडिओ फिल्म्स निर्मित मराठी लघुपट “शॉर्टकट” या पोस्टरचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची राज्यव्यापी आढावा बैठकीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.

यावेळी मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर, उपाध्यक्ष, अभिनेते रमेश परदेशी, दिग्दर्शक सागर पाठक, सरचिटणीस शशांक नागवेकर, संदीप सावंत, जनहित कक्षाचे अध्यक्ष किशोर शिंदे , शॉर्टकट या लघुपटाचे दिग्दर्शक प्रणव आसरे, पिंपरी चिंचवड चित्रपट सेनेचे दत्ता घुले, तुकाराम शिंदे, सुरज लोणकर, शिवा दिलपाक, दिपक भालेराव, प्रसाद खैरे, रोहन पवार व १० जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

“शॉर्टकट” हा लघुपट चित्रपट क्षेत्रातील चांगल्या आणि वाईट गोष्टींवर भाष्य करणारा असून या लघुपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक प्रणव आसरे आणि लघुपटाच्या टीम ने उत्कृष्ट संदेश दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *