पुरस्कार सोहळा, पुस्तक प्रकाशन व कवी संमेलन ! ; काव्यानंद प्रतिष्ठान चा मनोरम त्रिवेणी साहित्य संगम…

चिंचवड I झुंज न्यूज : काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे आणि साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स द्वारा आयोजित पुरस्कार वितरण समारंभ, पुस्तक प्रकाशन आणि निमंत्रितांचे कवी संमेलन प्रतिभा महाविद्यालय सभागृह चिंचवड स्टेशन पुणे येथे संपन्न झाले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नेरूळ येथील ज्येष्ठ साहित्यिक श्री. मिलिंद कल्याणकर हे होते तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व संत चित्रकार श्री. वि ग सातपुते हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कथाकार श्री. नागेश शेवाळकर आणि आपलं व्यासपीठ च्या संचालिका सौ ज्योती जाधव हलगेकर होत्या.

कवयित्री वाणी ताकवणे यांनी गणेश वंदना आणि भाग्या खंडेलवाल हिने गुरुवंदना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री सुनिल खंडेलवाल यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. सीमा गांधी यांनी केले.आभार प्रदर्शन काव्यानंद चे सचिव श्री विवेकानंद पोटे यांनी केले.

स्व.चिंतामणराव पोटे काव्यमित्र पुरस्कार २०२२ मुंबई येथील कवयित्री सौ.रूपाली चेऊलकर यांना दरवळ या मराठी काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. स्व. निर्मलादेवी खंडेलवाल स्मृती काव्य सन्मान २०२२ पुणे येथील कवयित्री सौ. वाणी ताकवणे यांना त्यांच्या आरंभ या हिंदी काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. नागपूर येथील कवयित्री सौ.सुनिता गायकवाड यांच्या मनातल्या पानातून या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. तर मुंबई येथील लेखिका सौ. वंदना ताम्हाणे यांच्या आम्ही बोलतोय या लेख संग्रहाचे प्रकाशन झाले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दौंड येथील श्री प्रमोद कबनुरकर, प्रतिभा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ.अमिता देशपांडे, काव्यानंदचे कोषाध्यक्ष अमोल शेळके, वंश खंडेलवाल व सौ. स्वाती खंडेलवाल यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कवी संमेलन संपन्न झाले.

बाबू डिसोझा, संगीता काळभोर, यशवंत देव, भाग्यश्री मोडक, मनीषा पाटील, वंदना ताम्हाणे, अंजली नवांगुल, सुनिता बोडस, ज्योती जाधव हलगेकर, सुनिता गायकवाड , रुपाली चेऊलकर, वाणी ताकवणे ,रामचंद्र किल्लेदार , संजय जगताप, तुकाराम डोके,दिपाली पवार , सुहास घुमरे, चैतन्य काळे, विवेकानंद पोटे, सीमा गांधी, सुनिल खंडेलवाल, वि.ग.सातपुते यांनी आपल्या कविता सादर केल्या.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *