मॉडर्न हायस्कूलमध्ये तब्बल २७ वर्षानंतर पुन्हा माजी विद्यार्थी व शिक्षकांची भरली शाळा…

माजी विद्यार्थ्यांकडून आयोजित स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा

पुणे I झुंज न्यूज : गणेशखिंड येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये सन 1995-96 दहावी ‘ब’ च्या वर्गाने माजी विद्यार्थी- शिक्षक स्नेह मेळावा 27 वर्षानंतर आयोजित केले होते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा त्या माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांची शाळा भरली व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

यावेळी सन्माननीय शिक्षकांना फेटे बांधून तसेच हलगी वाद्य वाजवून पुष्प वर्षावामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला स्मार्ट क्लास बनवण्यासाठी थोडीशी मदत स्वरूपात 55,555 रु निधी देण्यात आला. दरम्यान व्यक्तिगत देणगी देऊन व 70 टक्के स्पॉन्सरशिप मुलींनी देऊन स्त्रीशक्तीचे दर्शन घडवले.

 

माजी विद्यार्थ्यांनी साध्य केलेले यश डॉक्टर, शिक्षक, पोलीस, व्यावसायिक, तंत्रस्नेही, आयटी क्षेत्र हे पाहून शिक्षकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. बालपणीची आठवण म्हणून संगीत खुर्ची अंताक्षरी मिमिक्री अशा खेळ ठेवण्यात आले व त्यात प्रथम येणार्‍यांना बक्षीस सुद्धा देण्यात आले.

सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी श्रीमती अंतुरकर, श्री पाचारणे /सौ पाचारणे, श्री बनसोडे , श्री शामराज, श्री भुजबळ तसेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे समन्वयक श्री. खरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कामठे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन श्री हेमंत धनकुडे,विकास शिंदे, अलसबा पठाण, शांता जिरगी यांनी केले होते.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *