पुणे I झुंज न्यूज : राज्यात टीईटी घोटाळ्याचे प्रकरण अजूनही संपलेले नाही. या टीईटी घोटाळ्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडून दिली होती. या प्रकरणात अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करत ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा करत नोकरी मिळवली होती. या प्रकरणानंतर आता दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्र देण्याचा प्रकार उघड झाला आहे. एक बनावट वेबसाइट उघडून विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्र दिली जात असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी उघड केला आहे.
काय आहे प्रकार
पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी कार्यरत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट बेवसाइट बनवली. त्या माध्यमातून तब्बल ७०० जणांना दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले.
दहावी, बारावीत नापास झालेल्यांना बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करुन संदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्याने ६० हजार रुपयांमध्ये प्रमाणपत्र मिळेल, असे सांगितले. बनावट ग्राहकाने काही रक्कम त्याला दिली व उर्वरित रक्कम घेण्यासाठी आला असताना पोलिसांनी सापळा रचून पकडले.
तिघांना अटक
पोलिसांनी कांबळे यांची चौकशी केली. त्यात कृष्णा सोनाजी गिरी, अल्ताफ शेख व सय्यद इम्रान यांची नावे उघड झाली. त्यांना अटक केली आहे.
अनेक ठिकाणी एंजट
बनावट प्रमाणपत्र घेणारे ग्राहक शोधण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी या लोकांनी एजंट नेमले होते. संदीप कांबळे एजंट म्हणून काम करत होता. एका प्रमाणपत्रासाठी ते ३५ ते ५० हजार रुपये घेत होते.
२०१९ मध्ये वेबसाइट
महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल नावाची वेबसाइट २०१९ मध्ये केली होती. सुरुवातीला ३५ जणांना प्रमाणपत्र दिले. त्यानंतर ७०० जणांना अशी प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले. दहावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेट बरोबर मार्कशीट आणि स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट देत होते.
टीईटी प्रकरणात ईडीचाही तपास
टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय आहे. मार्च 2019 मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेचा निकाल 2020 ला लागला होता. 16,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यातील आठ हजार प्रकरणे चौकशीच्या रडारवर होती.