(प्रतिनिधी : ज्ञानेश्वर मिडगुले )
शिरूर I झुंज न्यूज : वाचन संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे काम करत वाचनालयाला हजारो पुस्तके देणाऱ्या के.डी. भाऊंचे नाव वाचनालयास द्यावे , अशी मागणी बऱ्याच वक्त्यांनी शोक सभेत केल्याने कोरेगाव भिमाचे सरपंच व ग्रामस्थांनी एकमताने मान्यता दिली .
जेष्ठ पत्रकार के.डी. गव्हाणे यांचे पत्रकारीतेबरोबर विद्यार्थी दिनदर्शिकेचे, वाचनालय आदी प्रशंसनीय कामांचे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, लेखक सचिन बेंडभर, संजय काशीद ,अमित कदम, संपतराव गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे ,केशव फडतरे , विवेक ढेरंगे, उदयकांत ब्राह्मणे , बाबूशा ढेरंगे, दत्ता ढेरंगे ,अॅड. बापूसाहेब गव्हाणे , लक्ष्मण भंडारे , विजयराज गव्हाणे ,पत्रकार सतीश धुमाळ ,ज्ञानेश्वर मिडगुले , विक्रम गव्हाणे, अनिल काशीद,नारायण फडतरे,श्री. सोनवणे , बॅकेचे संचालक राजाराम ढेरंगे ,गणपतराव काळकुटे , प्रबोधनकार उत्तमआण्णा भोंडवे , जेष्ठ नेतेआबासाहेब गव्हाणे आदी मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली .
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे संघटक सुनील वाळुंज, पत्रकार गणेश थोरात, राजाराम गायकवाड, शरद राजगुरू, विठ्ठल वळसे पाटील आदीसह कोरेगाव ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते .सुनील लोणकर यांनी सांगितले की, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी के.डी. भाऊ गव्हाणे यांच्या अपघातानंतर मृत्यूपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना बहुमोल अशी मदत केली.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व मराठी पत्रकार परिषद, पुणे जिल्हा पत्रकार संघ व शिरूर पत्रकार संघ के.डी भाऊ गव्हाणे पाटील यांचे विचार जोपासून त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी तन-मन धनाने शेवटपर्यंत पाठीशी राहील. के.डी. भाऊ गव्हाणे यांच्या कार्याचा वसा व वारसा कोरेगाव भीमा पंचक्रोशीने जपावा. आभार प्रदर्शन सुनील भांडवलकर यांनी तर सूत्रसंचालन मधुकर कंद यांनी केले .