पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथील वाकडस्थित स्वराज्य सामाजिक संस्थेने रुग्णालयामध्ये डायलेसिसचे उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी एक मदतीचा हात पुढे केला आहे. रुग्णालयामध्ये डायलेसिसचे उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत डायलेसिस तसेच उपचारासाठी लागणारे सर्जिकल्स आणि इंजेक्टेबल्स ५०% सवलतीच्या दरामध्ये देण्यात येणार आहेत.
स्वराज्य सामाजिक संस्थेची स्थापना वाकड येथील मा. श्री अमोल कलाटे, मा. श्री श्रीनिवास कलाटे यांच्या दूरदृष्टी आणि सामाजिक जाणिवेतून करण्यात आली आहे. याच सामाजिक भावनेने डायलेसिसच्या रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी दर्श फार्मा अँड सार्जिकल्सचे कमलेश बाफना यांच्या माध्यमातुन ही योजना सुरु करण्यात आली आहे. आज या योजनेची माहिती देण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वाकड येथील हॉटेल अप साउथ येथे पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यांना ही सवलत योजना घ्यायची आहे त्यांनी श्री. कमलेश बाफना (दर्श फार्मा अँड सार्जिकल्स, उत्कर्ष चौक, दत्त मंदिर रोड, वाकड. मो. ८६९८५४०२००) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत संस्थेचे सर्व पदाधिकारी श्री. अमोल कलाटे, श्री. श्रीनिवास कलाटे, श्री. कमलेश बाफना, श्री रावसाहेब डोंगरे, श्री सुदेश राजे, सीने अभिनेत्री मोनिका पन्हाळे इ. उपस्थित होते.