गगनगिरी मठात रंगला ‘शब्दांचा’ सुरेल दरबार ; कोकण मराठी साहित्य परिषद व साहित्य कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यसंमेलन…

खोपोली I झुंज न्यूज : खोपोली येथील कोकण मराठी साहित्य परिषद व साहित्य कला मंच पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यसंमेलनात शब्दांचा सुंदर दरबार भरला होता.

खोपोली कोकण मराठी साहित्य परिषदचे सदस्य व सध्या निगडी , पुणे निवासी श्री बाबू डिसोजा यांचे सुचनेनुसार हा अभिनव उपक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

खोपोली येथील कोमसाप चे उपाध्यक्ष व रायगड जिल्हा बाल विभाग प्रमुख श्री प्रकाश राजोपाध्ये, रायगड जिल्हा कोषाध्यक्ष सौ.रेखा कोरे,बालविभाग सल्लागार श्री अण्णासाहेब कोरे ,कोमसाप खोपोली, कार्याध्यक्ष श्री नरेंद्र हर्डीकर,सदस्या सौ‌.निशाताई दळवी, तसेच पिंपरी चिंचवड साहित्य मंचाचे कविगण यांनी सहभाग घेतला.

प्रारंभी श्री प्रकाश राजोपाध्ये यांनी उपस्थितांचे स्वागत केले.समरंभाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा कोमसाप कोषाध्यक्षा सौ रेखा कोरे होत्या . श्री बाबू डिसोजा, प्रा.श्री तुकाराम पाटील,राजेंद्र धावटे, पिंपरी चिंचवड साहित्य मंचचे अध्यक्ष व व्याख्यान माला समन्वयक, श्री राज आहेरराव, नवयुग साहित्य आणि शिक्षण मंडळ अध्यक्ष, सौ. सविता इंगळे अध्यक्ष स्वयंसिद्धा यांचे स्वागत श्री प्रकाश राजोपाध्ये, श्री कोरे सर यांनी केले.

खोपोली येथील कवी निशा दळवी,नरेंद्र हर्डीकर, रेखा कोरे तर पिंपरी चिंचवड चे कवी नंदकुमार मुरडे,वंदना इन्नानी, रजनी आहेरराव,राजेंद्र घावटे, तुकाराम पाटील,बाबू डिसोजा,राज आहेरराव, सीमा गांधी आदिंनी आपल्या कविता सादर केल्या. सर्व कवींनी शब्दांची उधळण करीत वातावरण आनंदित केले.

मा.प्रकाश ननावरे, उज्जवला ननावरे,राजेंद्र पगारे,वंदना पगारे, सुनिल दिवटे,शालिनीताई दिवटे, सौ. माधुरी डिसोजा , सौ. नेहा कुलकर्णी,एकनाथ उगले, मनीषा उगले ,पी. बी. शिंदे,ज्योती देशमुख , मंगला पाटील, प्रसन्ना सर, मिसेस प्रसन्ना, अश्विनी कुलकर्णी,बाबा कुलकर्णी, भावना क्षीरसागर, अनिकेत गुहे आदिंची उपस्थिती होती.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ सीमा गांधी यांनी बहारदारपणे केले. शेवटी आभारप्रदर्शन उपाध्यक्ष श्री नरेंद्र हर्डीकर यांनी केले. यावेळी गगनगिरी आश्रमाने पाहुण्यांना चहा,नास्ता व संध्याकाळी महाप्रसाद यांचे उत्कृष्ट नियोजन केले. श्री कोरे सर, श्री प्रकाश राजोपाध्ये, सौ.कोरे,सौ दळवी निशा यांनी यासाठी परिश्रम घेतले.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *