पुणे I झुंज न्यूज : मकर संक्रांत चे औचित्य साधून हडपसर कलाकार महासंघ यांच्या वतीने कलाकार पतंग महोत्सव २०२३ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अनाथालय तुकाई दर्शन हडपसर येथे वृद्ध आजी आजोबा व अनात मुलांसमवेत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत बोगम, कुणाल देशमुख, दत्ता दळवी, श्रीकृष्ण भिंगारे, विकास वाघमारे, राजेंद्र बापू तुपे, जगदीश चव्हाण, राज कडेकर, अविनाश कीर्ती यांनी केले होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश रणदिवे अविनाश कीर्ती यांनी केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले अभिनेता अक्षय वाघमारे, अभिनेत्री गायत्री जाधव, अभिनेत्री आर्या घारे, अभिनेता प्रेम संदीप धर्माधिकारी, बालकलाकार आर्यन हगवणे यांना चित्रपट आणि नाट्य संस्थेच्या संस्थापक शुभम मोरे, महा.राज्य उपाध्यक्ष कुणाल देशमुख यांच्या वतीने सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.
अनाथ आश्रमातील मुलांचे चित्रपट व मालिकेतील कलाकारांनी मनोरंजन केले. तसेच खाऊ वाटप करून पतंग उडून जल्लोषात कलाकार पतंग महोत्सव चिमुकल्या मुलांसोबत करून एक आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला.