पन्नास कवी पत्रकार हे तीन लाख प्रेक्षकांमध्ये मला “लाख” मोलाचे – प्रा. अनंत राऊत

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कविता संमेलनात काव्याची मैफिल रंगली

पिंपरी | झुंज न्यूज : पन्नास कवी पत्रकार हे तीन लाख प्रेक्षकांमध्ये मला “लाख” मोलाचे आहेत असे प्रतिपादन विदर्भातील प्रसिद्ध कवी प्रा. अनंत राऊत यांनी केले.

IMG_8919
पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया आयोजित पत्रकार काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत राऊत यांनी आपल्या कवितांनी काव्य मैफिलीत रंगत आणली.

Anant_Raut 
या काव्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आजित गव्हाणे यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांमधे दडलेली कला व्यक्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगीतले. तर प्रा. वाघमारे यांनी मकरंद अनासपुरे यांच्या हुबेहुब आवाजात कोरोना काळात डाॅक्टरांनी रुग्णांची कशी लुट केली यावर मिमिक्री करत हास्याचे फवारे उडवले.

Anil_Wadghule
यावेळी विदर्भ कवी अनंत राऊत यांनी विनोदी किस्से सांगत अती सुरस, मित्र वणव्यामधे गारव्यासारखा, शेतकरी आत्महत्या, शब्दांना रक्ताचे अमृत, अशा विविध कवितांनी खळखळुन हसवले तर कधी भावनिक केले. त्याला कवी मनाच्या पत्रकारांनी टाळ्यांनी दाद दिली.
यावेळी डाॅ प्रकाश कोयाडे, राष्ट्रवादी काँग्रेस क्रिडा सेल अध्यक्ष समिता गोरे, देऊळबंद चित्रपटातील अभिनेत्री आर्या घारे, पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक अधिकारी बाळासाहेब ढसाळ, पत्रकार हल्ला कृती समितीचे अनिल भालेराव, गोपाल मोटघरे, प्रवक्ते प्रशांत साळुंखे, विनायक गायकवाड, शिवाजी घोडे, राम बनसोडे, राकेश पगारे, देवा भालके, आपला आवाज चे रोहीत खर्गे, सचिव प्रविण शिर्के, विश्वजित पाटील, श्रावणी कामत, पपु साळुंखे, अविनाश आदक, मुझफर इनामदार, विकास शिंदे, आदि पत्रकार उपस्थित होते.
दै सामनाचे स्व. भालचंद्र मगदूम नावाने दिला जाणारा कविरत्न पुरस्कार आय बी एन लोकमत चॅनेल चे प्रतिनिधि गोविंद वाकडे यांना या वेळी देण्यात आला. तसेच या काव्य मैफल दरम्यान परिषदेचे सचीव नाना कांबळे यांनी पर्यावरण विषयक तर पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी चालु राजकीय स्थितीवर विडंबन काव्य सादर केले.
माधुरी कोराड, घराला आकार देणारी मुलगीच, राजु वारभुवन, आई पीएच.डी झाली. जेष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के माझी लेखणी, अमृता ओंबाळे जगाचा नियम, अमोल काकडे मैं सवाल हुं, दिपेश सुराणा,मैने जिंदगीसे, पितांबर लोहार, सरकार जाईल, सरकार येईल मारुती बानेवार आम्ही पत्रकार, बाबु डिसुजा, गोविंद वाकडे, भुषण नांदूरकर, संजय बेंडे, प्रशांत चव्हाण आदि जेष्ठ कवी मनाच्या पत्रकारांनी अति सुरस अशा कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पितांबर लोहार यांनी तर अनिल वडघुले यांनी प्रास्ताविक केले.बाळासाहेब ढसाळ यांनी आभार व्यक्त केले.

IMG_8918

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *