पुणे I झुंज न्यूज : आपल्या आईच्या नितांत प्रेमाची साक्ष म्हणून प्रसिद्ध कवियित्री प्रा, शालिनी सहारे यांनी आपल्या आईच्या वाढदिवसा निमित्त जेष्ठ ख्यातनाम साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, आणि जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांचे हस्ते , काव्यशालिनी या काव्यसाहित्याचे प्रकाशन नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पुणे येथे गुरुवारी संपन्न झाले.
याप्रसंगी प्राचार्या उज्वला उपाध्ये कुलकर्णी, प्रा सुरेशचंद्र म्हात्रे, कैलास बनसोडे, शंकर घोरपडे सर, कवियित्री विजया टाळकुटे, देव समुद्र,उपप्राचार्या काकडे, कैलास बनसोडे, सुनील तुळसे उत्कर्षा नंदेशवर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मातृप्रेम, निसर्ग प्रेम याची अनुभूती देणारे साहित्य काव्यशालिनी हे एक बहुआयामी लेखिकेने लिहिले याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचा अभिमान डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला उपस्थित मान्यवरांनीही या काव्य साहित्याचे भरभरून कौतुक केले.
माझ्या आईने शारदा सहारे हिने अपार यातना सहन करीत मला घडविले त्याआईच्या वाढदिवसानिमित्त मला माझे काव्यशालिनी साहित्य प्रकाशन लोकार्पण सोहळा करता आला हे माझे थोर भाग्य असल्याचे भावनिक मत कवियत्री अभिनेत्री लेखिका शालिनी सहारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुश्राव्य सूत्रसंचलन ओंकारेश्वरी यांनी केले.