लेखन : दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०
“महाराष्ट्रात अनेक जागृत देवस्थानं आहेत. छत्रपती शिवरायांना पावलेली व भवानी तलवार दिलेली तुळजाभवानी, कोल्हापुरची महालक्ष्मी, कार्ल्याची एकवीरा देवी, वज्रेश्वरीची देवी, विरारची जीवदानी देवी, सप्तशृंगीवरील वणीची सप्तशृंगी देवी, महालक्ष्मीची महालक्ष्मी देवी, शिवाय शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजाजन महाराज, आळंदीची संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी, माहुरगडावरील अनुसया देवी, कोंकणातील अनेक जागृत देवस्थानं त्यात आंगणेवाडीची देवी अशी अनेकानेक जागृत देवस्थानं असताना हा एकनाथ महाराष्ट्रातून अनाथ झाल्याप्रमाणे आसाम येथील गुवाहाटीत असलेल्या मां कामाख्या देवीच्या भजनी का लागले ? याचे रहस्य उलगडे तर सत्य समोर येईल.
देव देवता मानणे न मानणे हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे. जारण- मारण- तारण हा तर अंधश्रद्धेचा भाग आहे. मात्र आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नेमके जारण- मारण व तंत्र विद्येचे भोक्ते आहेत हे त्यांच्या देहबोलीवरून व कपाळावर लावलेला विशिष्ट ठळक टिळा यावरून स्पष्टपणे दिसून येते. शिवाय बोलताना ते काय चघळत असतात ? हा ही संशोधनाचा व औत्सुक्याचा विषय आहे.
नुकतेच ते एका ज्योतिषाला आपले भविष्य विचारायला गेले होते. ज्यांचा स्वकर्तृत्वावर विश्वास नसतो व हेतू प्रामाणिक नसतो तेच अशा भविष्याच्या थोतांडावर विसूबून राहतात. हा देखील अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अनैतिक प्रकार आहे. जर ज्योतिषाला भूत भवितष्याचे ज्ञान असेल तर त्यांना असे हातावरील रेषा पाहत पोट भरावे लागले नसते. संत तुकाराम महाराज व संत गाडगे बाबा या संतांनी यावर कडक शब्दांत तोशेरे ओढले आहेत. अशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जारण- मारण-तारण व भविष्यवेत्यांवर विसंबून राहतात नवस सायास व तंत्र विद्येचा आधार घेतात, हे कितपत शोभनीय आहे ?
कामाख्या देवीचे मंदिर आसामध्ये आहे. ते ५१ शक्तिपीठांपैकी एक असल्याचे मानले जाते. ये़थे अघोरी, साधु व तांत्रिकांची गर्दी असते. नव्हे तर तो त्यांचा अड्डाच मानला जातो. येथे देवीची मूर्ती वा चित्र नाही. फक्त एक कुंड असून ते नेहमी फुलांनी आच्छादलेले असते व त्यातून सतत पाणी झिरपत असते.
या ठिकाणी, भगवान विष्णूने भगवान शंकराची माता सतीवरील आसक्ति नष्ट करण्यासाठी तिच्या देहाचे ५१ तुकडे केले व त्यातील योनीचा भाग येथे पडल्याने हे एक शक्तिपीठ निर्माण झाले ! अशी आख्यायिका आहे. या चमत्कारीक देवळात योनीची नियमित पूजा केली जाते. दरमहा देवीला मासिक पाळीचा रक्तस्त्राव होतो व या काळात तीन दिवस देऊळ बंद ठेवले जाते. यावेळी देवळात पांढरे कापड टाकले जाते व ते नंतर लाल रंगाचे होते. देवळात येणाऱ्या भक्तांना या लाल रंगाच्या कपड्याचा तुकडा प्रसाद म्हणुन दिला जातो.
येथे मनोकामना पूर्तीसाठी कन्या पूजन व पशुंचे बळी दिले जातात. पशु मादी नसावी ही अट असते. काली व त्रिपुरा सुंदरी नंतरची ही तांत्रिक व मांत्रिकांची देवी असून तांत्रिक व मांत्रिकांचा येथे नेहमी राबता असतो. तांत्रिक आपल्या शक्तिने आपल्या ग्राहकाच्या इच्छापूर्तीसाठी तंत्र मंत्र व अघोरी विद्येचा उपयोग करतात. तसेच तंत्र-मंत्राने पीडीतांची सुटका करतात.
या भादरायणानंतर आपल्या लक्षात आलेच असेल की, महाराष्ट्रातील असंख्य शक्तिपीठं सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामाख्या देवीचे परमभक्त का झाले आहेत. स्वपक्षाशी गद्दारी करून व पक्ष प्रमुखाच्या पाठीत खंजीर खुपसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तो या योनी पुजक तंत्र मंत्र व अघोरी शक्तिच्या आशीर्वादाने ! तंत्र मंत्र व अघोरी शक्तीचा प्रभाव आत्ता संपत आल्याने एकनाथ शिंदे याने आपली अघोरी विद्या व काळी जादूची बॅटरी रिचार्ज करण्यासा़ठी पुन्हा योनी पुजन करून व अघोरी शक्तीचे बळ संपादन करण्यासाठी व आपले शत्रू उद्धव बाळ ठाकरे यांच्यावर काळी जादू करून वश व हतबल करण्यासाठी कामाख्या देवीस नवस करण्यास जात आहेत. तंत्र मंत्र व काळी जादू दुष्ट प्रवृत्तीस दीर्घकाळ साथ देत नाही व ती काळी जादू करणाऱ्यवर व करून घेणाऱ्यावरच उलटते. त्यामुळे यावेळची कामाख्या देवीची यात्रा सुफळ व संपन्न होणार नसून दैवी शक्तिचा गैरवापर केल्याबद्धल देवीचा कोप होऊन गद्दारांची सद्दी संपेल, याची मला खात्री आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीवाल्यांना माझे आव्हान आहे, आपण हे थोतांड थांबवण्याचा प्रयत्न करावा व अंधश्रद्धा निर्मुलन कायद्या अंतर्गत कारवाईसाठी प्रयत्न करावेत…!