जांबे I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील अत्यंत झपाट्याने विकसित होत असलेले गाव जांबे या ठिकाणी गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन राजकारण विरहीत व संघ भावनेसह शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी खिलाडू वृत्तीचा विकास हेतू JPL (जांबे प्रिमियर लिग) चे दुसरे पर्व निकोप व धडाक्यात पार पडले क्रिकेटस्पर्धेच्या माध्यमातून परिसरातील सर्व मुले तसेच तरुण व ज्येष्ठ खेळाडूंच्या सहभागाने ही सर्वांना एकसंध ठेवणारी स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेचे आयोजन हे राष्ट्रीय खेळा प्रमाणे निलाव पद्धतीने करण्यात आले होते. शिवनेरी फायटर्स, रायगड वॉरियर्स, राजगड वॉरियर्स, तोरणा फायटर्स, सिंहगड वॉरियर्स, प्रतापगड वॉरियर्स या सहा संघाने सहभाग घेतला होता प्रत्येक संघाला एक संघ मालक कोच असे नियोजन केले होते. दर दिवशी पिण्याचे पाणी, नाष्टा ,जेवण ,जनरेटर सुविधा आणि सर्व सामन्यांचे यू ट्युब लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.
सुंदर जर्सी व प्रत्येक संघाला गड दुर्गांची नावे दिली गेली होती. त्यात एकूण सहा संघ सहभागी झाले होते व त्या पैकी सिंहगड वॉरियर्स या संघाने शेवटच्या अंतिम चुरशीच्या लढतीत तोरणा फायटर्स या संघाला नामोहरम करत दुसऱ्या पर्वाचे विजेते पद आपल्या नावे केलें व दुसऱ्या पर्वाचा किताब पटकावला या संघाचे संघ मालक विजय गायकवाड यांनी आयोजक व आपल्या संघाच्या कामगिरी बद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या व संघाचे कर्णधार भाऊसाहेब गायकवाड यांनी संघ मालक व सहकारी खेळाडूंनी केलेल्या खेळाचे व सहकार्याबददल आभार मानले.
सर्वात जास्त बळी घेणारे गोलंदाज म्हणून धर्मा गायकवाड यांची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली विशेष म्हणजे विजेत्या संघात पिता पुत्र म्हणुन सुधाकर जगताप व अथर्व जगताप यांची कामगिरी वाखण्याजोगी होती. तसेच फलंदाज म्हणुन कुणाल हेंबाडे याने उत्तम भूमिका बजावली तसेच सार्थक गायकवाड या नवोदित तरूण खेळाडूने सर्व स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी करत संघाला विजयाच्या शिखरावर पोहचवले व संघाला विराट विजय मिळवून दिला त्याच्या उत्तम गोलंदाजीचा व फलंदाजीचा संघाला प्रत्येक मॅच मध्ये नेहमी फायदा झाला.
राजाभाऊ गायकवाड यांनी विजेत्या संघाचे संघ मालक कर्णधार व विजयी संघाचे अभिनंदन केले व आपले मिञ स्व. संतोष (आबा) गायकवाड व स्व.विठ्ठल जैद यांची आठवण काढत आमचा गड आला पण सिंह गेला असे म्हणत विजय व विजयी चषक त्यांना समर्पित केला.अशाप्रकारे पंचक्रोशितून विजेत्या संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विजेत्या संघाचे खेळाडू मध्ये विजय गायकवाड (संघ मालक), भाऊसाहेब गायकवाड (कर्णधार), पांडुरंग गायकवाड, सुधाकर जगताप, कुणाल हेंबाडे, सार्थक गायकवाड, सुनील गायकवाड, धर्मा गायकवाड, विनायक मगर, संदिप देंडगे, आदित्य गायकवाड, सुशांत गायकवाड, अथर्व जगताप या सर्व स्पर्धेला दिवाळीच्या तोंडावर देखील परिसरातील असंख्य प्रेक्षक वर्ग व क्रिकेटप्रेमींनी दाद दिली.
विषेश म्हणजे या स्पर्धेच्या निकोप होण्यासाठी अमोल गायकवाड, हरीश टेमगिरे, रवी गायकवाड, संदेश वाजे, सचिन मांदळे यांनी खूप मेहनत घेतली व तालुक्याचे स्पर्धेकडे लक्ष वेधून घेतले.