अरे, तो बापचं ! प्राणाची बाजी लावून बायको, मुलीला वाचविण्यासाठी बिबट्याशी ‘झुंज’ ; त्या पित्याला आणि त्यांच्या शौर्याला त्रिवार वंदन…

(प्रतिनिधी : ज्ञानेश्वर मिटगुले)

सणसवाडी I झुंज न्यूज : आपल्या बायको आणि मुलीला बिबटयापासून वाचवण्यासाठी वडिलांनी स्वतः बिबटया सोबत दोन हात करून त्याचा गळा दाबून मारले. आपल्या हिंदु मध्ये आजही आपल्या पूर्वजांचे रक्त वाहत आहे. त्याची ही साक्ष. ट्रायल टायगर देखील टायगर पेक्षा कमी नाही. छत्रपती संभाजी राजांची वाघासी झुंज ‘ जबड्यात घालूनी हात – मोजीतो दात – अशी ही जात मराठ्यांची ‘ शब्दात वर्णिली जाते .

मग आपल्या बायको मुलीवर चवताळून आलेल्या वाघाला अडवून त्याचेसी बराच वेळ झुंज देत आपल्या हाताने त्याचा गळा आवळून धारातीर्थी पाडलेल्या या बापाला कुठली उपमा ? रायगडाचा बुरुंज उतरणाऱ्या हिरकणीत जसं आईचं काळीज व धाडस उतरलं होतं , तसं स्वतःचे बायको मुलीचे जिवावर बेतू पहातेय म्हटल्यावर स्वतःचे जिवाची फिकीर न करता बिबट्या शी दोन हात करून त्याला नामोहरम करणाऱ्या बापाचं काळीज केवढं मोठं विशाल उदार असेल कल्पना करा.

“धन्य त्या पित्याला आणि त्यांच्या शौर्याला त्रिवार वंदन करावी अशी ऐतीहासीक घटनाच म्हणावी लागेल . दोघांतील लढाई दुर वरून पहाणारे युवक बिबट्या मरून निपचीत पडल्यावर जवळ आले तेव्हा सुम्मपणे मृत बिबट्या कडे पहाणाऱ्या बापालाही प्रश्न पडला होता, माझ्यात एवढी ताकत ,बळ , धाडस कुठून आलं ? पणे ते बायको मुलीचे मायेपोटी – प्रेमापोटी त्या हिरकनी प्रमाणे अवतरलेलं धाडस शंभूराजांप्रमाणे साकारलेला पराक्रमच म्हणावा लागेल.

अलिकडे गावोगावी बिबट्यांचे दर्शन होते , ज्या घरात असा बाप आहे , त्यांनी त्याच्यातला बाप जपून ठेवावा – त्याला माया स्नेह द्यावा एवढीच अपेक्षा करावी वाटते. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *