हिंजवडी I झुंज न्यूज : हिंजवडी परिसरात दिवड (बिनविषारी) जातीच्या भल्या मोठ्या सापास जीवदान देण्यात वाईल्ड अँनिमल्स अँण्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीतील सर्पमित्रांना यश आले.
हिंजवडी फेज-३ येथे असणाऱ्या नामांकित कॅपजेमिनी या कंपनीतून वाईल्ड अँनिमल्स अँण्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे सर्पमित्र अजित भालेराव यांना राजू जरळी यांनी साप असल्याची माहिती दिली होती. रात्रीच्या वेळेस ड्युटी वर असणाऱ्या सुरक्षारक्षकाला हा साप दिसून आला होता. रात्रीची वेळ असल्याने त्यांनी कोणालाही याची कल्पना दिली नाही. मात्र सकाळी सर्पमित्र अजित भालेराव या ठिकाणी पोहचले व सापाला बाहेर काढल्यानंतर त्याची लांबी आणि जाडी पाहून सर्वजन थक्क झाले.
जणू काही खात्यापित्या घरचा असावा. दिसायलाही अतिशय देखणा, पहिल्यांदाच असा साप हाताळले असता अजित भालेराव यांची मोठी तारांबळ उडाली होती. राजू जरळी व कंपनीतील त्यांचे उपस्थित सुरक्षा कर्मचारी यांनी घेतलेला पुढाकार यामुळे हा साप वाचवण्यात यश आले असे अजित भालेराव यांनी सांगितले.
हा साप ताब्यात घेऊन वाईल्ड अँनिमल्स अँण्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे सर्परक्षक तुषार पवार, शेखर महाराज जांभूळकर तसेच गणेश भुतकर यांना याची कल्पना दिली.
“दिवड साप हा बिनविषारी असून पाण्यात राहणारा साप आहे. याचे खाद्य बेडूक, मासे असते. साप आपल्या परिसरात सुरक्षीत ठिकाणच्या शोधात किंवा भक्षाच्या शोधात येतात. साप निसर्गाचा आणि आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे याला मारल्यास आपल्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होऊन शिक्षा होऊ शकते. आपल्या परिसरात वन्यप्राणी आढळले असता वन्यजीव प्रेमींना संपर्क करावा, त्यांचा जीव वाचवावा हे आपले कर्तव्य आहे. संस्थेतील सदस्य तुषार जोगदंड, सोहम चव्हाण,श्रीनिवास देवकाते या सर्पप्रेमींनी त्याला त्याच्या अधिवासात मुक्त करण्यात आले.
आपल्या परिसरात वन्यप्राणी आढळले असता वन्यजीव प्रेमींना संपर्क करावा. संस्थेचा संपर्क क्रमांक : तुषार पवार (९०११८८३०००), शेखर जांभूळकर (९९६०३५५५२२), गणेश भुतकर (९९७०६६८८८६)