पिंपरी I झुंज न्यूज : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधून लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांच्या वतीने पार पडलेल्या महाराष्ट्राची सौंदर्यवती 2022 पर्व 3 सौंदर्य स्पर्धेत महिला गटात पुण्याच्या दीक्षा गायकवाड यांनी प्रथम पारितोषिक पटकावले तसेच युवती गटात पुणे येथील सिद्धी शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
महिला गटात द्वितीय पारितोषिक प्रीती दराडेआणि तृतीय क्रमांक प्राजक्ता चौधरी यांना भेटला. युवती गटात द्वितीय पारितोषिक पल्लवी शिवाजी आणि तृतीय पारितोषिक रेणुका राऊत यांनी पटकावला. विशेष पुरस्कारासाठी तनिषा बडगुजर आणि प्राजक्ता देशपांडे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून मोनिका जाधव, गतविजेता नक्षत्रा गोकुळे आणि संदीपा जाना यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी केले.
कार्यक्रमाची ग्रूमिंग पार्थ पवार आणि रागिनी मोराळे यांनी केली. स्पर्धकांची वेशभूषा आणि केशरचना ग्लॅम लुक बाय सिमरन च्या सिमरन यांनी केली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लिटिल एंजल स्कूल किवळे चे संस्थापक आणि अध्यक्ष मच्छिंद्र तरस आणि मुख्याध्यापिका शुभांगी तरस तसेच गायत्री पैठणी आणि सिल्क साडीचे अमोल रोडे हे उपस्थित होते.
उद्योजक राजू साळुंखे आणि कपिल करपे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता लॉलीपॉप इंटरटेनमेंट संचालक संजय जोगदंड यांनी केली .कार्यक्रमास माननीय नितीन साळुंके आणि राज जोगदंड, शरद रोडे यांनी विशेष आभार मानले. कार्यक्रमास शिल्पा मगरे गाडेकर रेवती लोंढे, सोनाली पानसरे,मासूम युसुफ, अविनाश धोत्रे यांनी विशेष सहकार्य केले.