कान्हूर मेसाईच्या विद्याधामचे चित्रकला परीक्षेत घवघवीत यश ; समृद्धी तळोले ‘ए’ ग्रेड तर श्रद्धा पिंगळे ‘बी’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण…

(प्रतिनिधी : ज्ञानेश्वर मिडगुले)

सणसवाडी I झुंज न्यूज : महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला ग्रेड परीक्षेत कान्हूरच्या विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश मिळविले आहे.

चित्रकला इंटरमेजिएट परीक्षेत दहावीचे ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून समृद्धी दीपक तळोले ही विध्यार्थीनी ए ग्रेडमध्ये, तर श्रद्धा संजय पिंगळे ही विद्यार्थिनी बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाली आहे. विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे व कलाशिक्षक दीपक मोरे यांनी ही माहिती दिली.

या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत ह्या यशाचा लाभ मिळणार आहे. समृद्धी दीपक तळोले हिला जाहीर होणाऱ्या दहावीच्या निकालात ७ गुणांचा, श्रद्धा संजय पिंगळे हिला ५ गुणांचा,तर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही ३ गुणांचा लाभ मिळणार आहे.

विद्यार्थी हिताची काळजी घेऊन विद्यालयातील कलाशिक्षक दीपक मोरे व प्राचार्य अनिल शिंदे ह्यांनी चित्रकला परीक्षेत विशेष लक्ष दिल्याबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *