भिर्रर्रर्रर्रर्र… ! भारतातील सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतींचे टोकन पद्धतीने अचूक नियोजन ; पहिल्याच दिवशी धावले ३०० गाडे, २४ गाड्यांचे वरच्या फेरीत स्थान…

भोसरी I झुंज न्यूज : भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या शर्यतीत पहिल्या दिवशी तब्बल ३०० गाडे धावले आहेत. त्यापैकी २४ गाड्यांनी वरच्या फेरीत स्थान मिळवले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या नियोजनातून भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर सुरू आहे. या शर्यतींचे संयोजन जय हनुमान बैलगाडा मंडळ, राहुलदादा जाधव बैलगाडा मंडळाने केले आहे.

जय हनुमान बैलगाडा मंडळ व उत्सव समितीचे अध्यक्ष हनुमंत जाधव म्हणाले की, टोकन पद्धतीने शर्यतीचे नियोजन करण्यात आले. मात्र, २ हजारहून अधिक टोकन बूक झाल्यामुळे शर्यत नियोजित चार दिवसांऐवजी पाच दिवस घ्यावी लागली. उद्या, दि. २८ मे रोजी सकाळी माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन होईल.

सुमारे १२ हजार प्रेक्षकांची हजेरी…

स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन माजी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील भाजपाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, प्रसिद्घ गाडामालक उपस्थित होते. पहिल्या दिवशी एकूण ३०० गाडे धावले असून, त्यापैकी २४ गाड्यांनी वरच्या फेरीमध्ये स्थान मिळवले आहे. पहिल्या दिवशी सुमारे १२ हजार प्रेक्षकांनी घाटावर बैलगाडा शर्यतींचा थरार अनुभवला, असेही हनुमंत जाधव यांनी सांगितले.

FacebookTwitterLinkedinPinterestWhatsappYoutube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *