पिंपरी I झुंज न्यूज : नेहरू स्टेडियम येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ४८व्या कुमार गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघ विजेता झाला होता. या संघातील सिफा वस्ताद, भूमिका गोरे ,आणि मनीषा राठोड यांची बालेवाडी पुणे येथे ५/५/२०२२ पासून सुरू होत असलेल्या ४८व्या राज्यस्तर निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याच्या कबड्डी संघातून निवड झाली आहे.
सदर खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल श्रीमती सुषमा शिंदे सहायक आयुक्त क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्रीमती अनिता केदारी क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, विश्वास गेंगजे पर्यवेक्षक क्रीडा विभाग ,श्री चंद्रशेखर कदम मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव , श्री रामेश्वर पवार पर्यवेक्षक माध्यमिक विद्यालय थेरगाव व अनेक मान्यवरांनी स्वागत करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या आहेत.
या तीनही खेळाडूंना श्री आटवे बी.जी. क्रीडा मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांचे व्यवस्थापन श्रीमती सोनाली जाधव यांनी केले आहे.