बापरे ! मेट्रोची पहिल्याच दिवशी किती लाखांची कमाई ? तब्बल २१ हजार पुणेकरांनी केला प्रवास ; जाणून घ्या, प्रवासादरम्यान महत्वाच्या सूचना…

पुणे I झुंज न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन दुपारनंतर मेट्रोचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी ( citizens) खुला करण्यात आला आहे.

यानंतर पहिल्याच दिवशी वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 21 हजार नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. नागरिकांनी केलया प्रवासातून मेट्रोला पाच लाख 53 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अनेक नागरिकांनी सहकुटुंब , तरुणांनी मित्रमैत्रिणींच्या सोबत प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटूला.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन) लिमिटेडकडून पुण्यात महामेट्रोच्या (Mahametro) एकूण 32 किलोमीटरच्या मार्गापैकी12 किलोमीटरच्या मार्गावर काल पासून मेट्रो सुरु झाली. मेट्रो प्रशासनाच्या नियोजनानुसार दर अर्ध्या तासाच्या वारंवारितेने मेट्रो धावत आहे. या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी पाच स्थानके कार्यान्वित केली आहेत. यामध्ये तीन स्थानकांपर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपये तिकीट आणि चौथ्या आणि पाचव्या स्थानकासाठी 20 रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे.

इतक्या रुपयांचे तिकीट काढा

मेट्रोमधून प्रवास करत असताना नागरिकांना गरवारे कॉलेज, नळस्टॉप ते आयडीयल कॉलनी पर्यंत 10 रुपये तिकिट असणार आहे. त्यानंतर गरवारे कॉलेज ते आंनद नगरच्या चौथ्या स्टॉपसाठी 20 रुपये तिकीट मोजावे लागणार आहे. तर गरवारे कॉलेज ते वनाज स्टॉप पर्यंतच्या प्रवासासाठीही 20 रुपये तिकीट मोजावे लागणार आहे. गरवारे कॉलेज ते वनाज पर्यंतच्या मेट्रोचे मार्गवर नळस्टॉप, आयडीयल कॉलनी, आंनद नगर, ही स्थानके असणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगर पालिका ते फुगेवाडी दरम्यानच्या मेट्रो प्रवासासाठीही पहिल्या तीन स्थानकानांसाठी 10 रुपये तिकीट असणार आहे. त्यानंतरच्या तिसरी व चौथ्या स्टेशनासाठी 20 रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. पीसीएमसी ते फुगेवाडी दरम्यानच्या महामार्गावर संत तुकाराम नगर , भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी ही स्थानके असणार आहेत.

महत्वाच्या सूचना

हे करा

मेट्रोतून प्रवास करताना प्रवाश्यांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायची आहे.
प्रवास करताना रांगेत यावे. मेट्रो प्रवासात दृष्टीहीन प्रवाश्यांसाठी बनवण्यात आलेला मार्ग मोकळा ठेवावा, जेणे करून या प्रवाश्यांना प्रवास करणे सोपे जाईल.
मेट्रोतून प्रवास करताना प्रवाश्याच्या जवळ 25 किलो इतकेच सामन नेता येईल. सामानाच्या वजनाची मर्यादा घालून दिली आहे. (सामना 25 किलो पेक्षा अधिक वजनाचे नसावे. सामना 60 सेमी लांब 45 सेमी रुंद व 25 सेमी उंच असावे.
फलाटवर असलेल्या पिवळ्या रेषेच्या पलीकडे उभे राहावे.
प्रवास करताना महिला, मुले, दिव्यांग ,जेष्ठ नागरिकांना मार्ग मोकळा करून देऊन सहकार्य करावे.
स्थानकावर , फलाटावर गरज लागल्यास त तेथील सुरक्षा रक्षक, ग्राहक मंद केंद्राशी संपर्क साधा

हे करू नका

मेट्रोतून प्रवास करताना कचरा करु नका.
मेट्रो ट्रॅकवर पाऊल टाकू नका.
बंदुके, शस्त्र , दारुगोळा बाळगू नका.
ट्रेनचे दरवाजे जबरदस्तीने उघण्याचा प्रयत्न करू नका.
रेल्वे प्रवासात पाळीव प्राणी बाळगू नका.
तिकिटाविना प्रवास करण्याचा प्रयत्न करू नका.
मेट्रो स्थानकांचे विद्रुपीकरण करू नका.
तुम्ही जरा दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक नसाल तर लिफ्टचा वापर करू नका.
मद्यपान व नियम तोडण्यास प्रतिबंध आहे.
स्थानक व ट्रेनच्या आता खाद्यपदार्थाचा वापर करू नका.
अश्या सूचना मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *