मराठी पत्रकार परिषदेचे आणखी एक यश ; राज्यातील ८१३ वृत्तपत्रांच्या जाहिरातदरात मोठी वाढ

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांच्या हक्काचे जे विषय हाती घेतले त्याचा चिवटपणे पाठपुरावा करून नेहमीच त्यात यश मिळवले आहे. परिषदेने राज्यातील वृत्तपत्रांना दिल्या जाणारया जाहिरात दरात सरकारने वाढ करावी आणि जी वृत्तपत्रे नियमित प़काशित होतात त्यांना जाहिरात यादीवर घ्यावे अशी मागणी सातत्यानं केली होती, त्यासाठी औढा नागनाथ येथे राज्यव्यापी मेळावा, पुण्यात बैठक घेऊन त्यासाठी वेळोवेळी आंदोलनं करून सरकारचं या प़श्नांकडं लक्ष वेधलं होत. अखेर परिषदेच्या प़यत्नाला यश आले असून माहिती आणि जनसंपर्क विभागाने आज एक आदेश काढून राज्यातील वृत्तपत्रांना भरघोष दरवाढ दिली आहे.

सरकारच्या यानिर्णयाबददल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांचे आभार मानले आहेत. माहिती आणि जनसंपर्क विभागाने आज १३ ऑगस्ट २०२० रोजी एक आदेश काढून राज्यातील ८१३ नियतकलिकांना भरघोष अशी दरवाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ आजपासूनच अंमलात येणार असल्याचे सरकारी आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली महत्वाची मागणी पूर्ण झाली आहे.

महाराष्ट्रात अनेक छोटी दैनिकं तसेच साप्ताहिक निष्ठेनं काम करीत आहेत, नियमित अंक देखील प़काशित करीत असतात पण तीन वर्षे उलटून गेल्यानंतर देखील या नियतकलिकांना जाहिरात यादीवर घेण्यात आले नव्हते.. त्यांना जाहिरात यादीवर घ्यावे अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी होती.. आज सरकारने राज्यातील १३२ नियतकलिकांना नव्याने जाहिरात यादीवर घेतले आहे. सरकारचे त्याबद्दल आभार मात्र तरीही आणखी बरीच नियतकालिकं या यादीतून वगळली गेली आहेत.. सरकारने त्यांचाही विचार करावा अशी परिषदेची मागणी आहे.

सरकारने घेतलेल्या निर्णयाबददल मराठी पत्रकार परिषदेने एक पत्रक काढून सरकारला धन्यवाद दिले आहेत. या पत्रकावर एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *